विविध पक्ष आणि संघटना
पश्चिमेचें पाणी तुटीच्या खोऱ्यात आणण्यासाठी खा.पवार हे प्रयत्नशील-आ.काळे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यासाठी पश्चिमेचें पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेशी बैठक घेऊन मोठे प्रयत्न करत असून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष योगदान देत आहे.शिवाय राज्यात साखरेचा बफर स्टोक चा प्रश्न मार्गी लावला आहे.आगामी काळातही ते मदत करतील त्यातून राज्यात आगामी काळात राष्ट्रवादीचा नक्कीच मुख्यमंत्री होईल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.
ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून रविवार १२ डिसेंबर रोजी नेहरू सेंटर वरळी येथे सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडणार आहे.वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपणचे उदघाटन आज सकाळी कोपरगाव येथे करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.१२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण श्री साईबाबा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवा राष्ट्रवादीचे चारुदत्त सिनगर, कोपरगाव नगरपरिषदेचे गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक फकीर कुरेशी,कोपरगाव पंचायत समितीचे सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,संभाजी काळे,डॉ.अतिष काळे,डॉ.तुषार गलांडे,कर्मवीर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन,एम.टी.रोहमारे,माजी नगरसेवक रमेश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”खा.शरद पवार यांनी इ.स.१९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला.चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले.त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटीं दरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.आज त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपले स्वतःचे एक मोठे स्थान निर्माण केले आहे.त्यांना वगळून देशाचा इतिहास लिहिला जाणार नाही.त्याच्या कार्याला सलाम करण्यासाठी कोपरगावात हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे प्रतिपादन शेवटी आ.काळे यांनी म्हटले आहे.हे प्रक्षेपण अद्याप सुरूच आहे.