कोपरगाव तालुका
अड्.रणधीर यांची नोटरी पदावर नियुक्ती
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील रहिवाशी व कोपरगाव येथील विधी व्यावसायिक अड्.प्रदीप रणधीर यांची भारत सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून नोटरी पब्लिक पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अड्.प्रदीप रणधीर हे कोपरगाव येथील न्यायालयात गेले पंधरा वर्षांपासून विधी सेवा करत आहे.ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,नगर जिल्हा परिषद व पंचायत समिती व राज्य शासनाने स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ,युनियन बँक ऑफ इंडिया ,समृद्धी महामार्ग आदींचे पॅनल ऍडव्होकेट म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या नियुक्ती बद्दल कोपरगाव वकील संघाने त्यांचा नुकताच सत्कार केला आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.