जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात…या महोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना काळात दोन वर्षापासून खंडित झालेल्या गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांसाठी महत्वाचे व्यासपीठ बनला असून.२०२३ च्या गोदाकाठ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देखील नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे.

दरवर्षी वाट पाहणाऱ्या कोपरगाव तालुक्यासह शहरातील नागरिकांनी सलग तिसऱ्या दिवशी देखील गोदाकाठ महोत्सवाला मोठी गर्दी करून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू माफक दरात खरेदी केल्या.अस्सल ग्रामीण भागातील खाद्य पदार्थ यामध्ये विशेषत्वाने खान्देशचे मांडे आणि जे पदार्थ शहरात सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशा सर्व पदार्थांवर अनेक नागरिकांनी ताव मारला.आ.आशुतोष काळे यांनी आज या या उत्सवातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला असल्याचे दिसून आले आहे.

गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू,उत्पादने,सहजपणे शहरातील नागरिकांपर्यत पोहोचविता येत आहेत.हक्काची शहरी बाजारपेठ अनुभवण्याची व या बाजारपेठेत आपल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची चांगली संधी उपलब्ध झाल्यामुळे गोदाकाठ महोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे दरवर्षी बचत गटाच्या स्टॉल्सची संख्या वाढतांना दिसत असून त्याचबरोबर होणाऱ्या गर्दीचे विक्रम देखील मोडले जात आहे.होणाऱ्या मोठ्या आर्थिक उलाढालीतून बचत गटाच्या महिलांना नवी उमेद मिळत आहे.त्यामुळे ज्या उद्देशातून गोदाकाठ महोत्सव सुरु करण्यात आला आहे.तो उद्देश गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून साध्य झाल्याचे दिसून येत असल्याचे गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close