कोपरगाव तालुका
कोपरगाव शहराच्या विकासाला अडथळा कोणाचा झाले स्पष्ट-वहाडणे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच क्रमांकाच्या तलावाचे काम कोपरगाव विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्याझाल्या मार्गी लागले याचा अर्थ या जिव्हाळ्याच्या व महत्वाच्या कामास कोण झारीतील शुक्राचार्य होते हे स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता लगावला आहे.
आ.आशुतोष काळे निवडून येऊन सव्वा दोन महिन्याचा कालखंड उलटला आहे. तरीही काही पराभूत उमेदवार अजूनही जनतेला “करंटे”ठरविण्याच्या मागे लागले आहे.आपण हे-हे केले,ते-ते केले म्हूणून स्वतःच्या आरत्या ओवळण्याचे काम सुरु आहे.व स्वतःचे दोष शोधण्या ऐवजी तालुक्यातील मतदारांना व अन्य समाजसेवक ,पत्रकार यांना दोष ,दूषणे देण्याचे व अकाली शिमगा साजरा करण्याचे काम आज सव्वा दोन महिन्यापासून करत असल्या बद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक संपन्न होऊन त्यात भाजपास जास्त जागा येऊनही राज्यात महाआघाडीचे सरकार विराजमान झाले आहे.तर कोपरगाव विधानसभा मतदार संघात भाजपाची सत्ता जाऊन त्याजागी राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे निवडून येऊन सव्वा दोन महिन्याचा कालखंड उलटला आहे. तरीही काही पराभूत उमेदवार अजूनही जनतेला “करंटे”ठरविण्याच्या मागे लागले आहे.आपण हे-हे केले,ते-ते केले म्हूणून स्वतःच्या आरत्या ओवळण्याचे काम सुरु आहे.व स्वतःचे दोष शोधण्या ऐवजी तालुक्यातील मतदारांना व अन्य समाजसेवक ,पत्रकार यांना दोष ,दूषणे देण्याचे व अकाली शिमगा साजरा करण्याचे काम आज सव्वा दोन महिन्यापासून करत असल्या बद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.निवडणुका या जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया समजून आपण आपले दोष शोधून त्यावर उपाय योजना करण्याची संधी म्हणून त्यांच्याकडे पहिले पाहिजे व पुढील निवडणुकीचा पुन्हा हसतमुखाने सामना करायला हवा हे अपेक्षित असताना कोपरगावात मात्र नेमके लोकशाही समजून न घेता आपल्या “मी”पणाला व त्यासोबत आपल्या अहंकाराला मिरवण्याचे काम सध्या सुरु आहे.हे कोपरगाव विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले काही उमेदवार अद्यापही कोमातून बाहेर यायला तयार नसल्याबद्दल वहाडणे यांनी आश्चर्य व्यक्त केले असून एक प्रसिद्धी पत्रक काढून या प्रवृत्तीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
निवडणुकीतील पराभव विसरून सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते कामाला लागले आहेत.आपणही या निवडणुकीत पराभूत झालो.पण आपण मतदारांना दोष दिला नाही.कारण लोकशाहीत मतदारांनी दिलेला जनादेश मान्य करणे गरजेचे आहे.घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अशा निस्वार्थ देशसेवकानाही निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला होता.तो त्यांनी हसतमुखाने स्वीकारला होता.व राजकारण्यांत जी खिलाडूवृत्ती अपेक्षित असते ती त्यांच्यात होती.मात्र कोपरगाव तालुक्यात नेमकी त्याचीच वानवा आहे- विजय वहाडणे
विधानसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून किती दिवस मतदार व विरोधकांना दोष देत बसणार असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.कोपरगाव शहराच्या विकासात कुणाचा अडथळा होता हे “५ नंबर साठवण तलावाच्या” कामाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या शुभारंभामुळे जनतेच्या लक्षात आले आहे.निवडणुकीतील पराभव विसरून सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते,कार्यकर्ते कामाला लागले आहेत.आपणही या निवडणुकीत पराभूत झालो.पण आपण मतदारांना दोष दिला नाही.कारण लोकशाहीत मतदारांनी दिलेला जनादेश मान्य करणे गरजेचे आहे.घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अशा निस्वार्थ देशसेवकानाही निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला होता.तो त्यांनी हसतमुखाने स्वीकारला होता.व राजकारण्यांत जी खिलाडूवृत्ती अपेक्षित असते ती त्यांच्यात होती.मात्र कोपरगाव तालुक्यात नेमकी त्याचीच वानवा आहे.कोपरगाव शहरासाठी ४६ कोटी रुपये निधी आणला असे सांगणाऱ्या नेत्यांना आपण जाहीरपणे सवाल विचारतो कि,आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही किती निधी कोपरगाव नगरपरिषदेसाठी दिला व किती निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पळविला हे जाहिर करावे.तुमचे लाडके नगराध्यक्ष असतांना तुम्ही निधी आणला.पण मोदी मंचचे नगराध्यक्ष असतांना आणला नाही.कारण विजय वहाडणे शहर विकास करण्यात यशस्वी झाले तर आपल्याला राजकिय अडचणीचे होईल असे वाटल्यानेच “तो”निधी मिळू दिलेला नाही. पाच नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून आपण,माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,नरेंद्र मोदी विचार मंचचे कार्यकर्ते,नितीन शिंदे सातत्याने प्रयत्न करत होतो,तरी तो होत नव्हता.पण विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झाल्याबरोबर,आ.आशुतोष काळे यांचे सहकार्यातून कामाचा शुभारंभही होतो यातूनच जनतेला खरा काय तो बोध झाला आहे. आपण विधानसभा निवडणुकीनंतर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.पण जनतेचा गैरसमज होऊ नये,सत्यस्थिती कळावी यासाठी हे निवेदन जनतेसाठी प्रसिद्धीस देत आहे.सामाजिक संकेतस्थळाचे सध्या काही लोकांना फारच वावडे असल्याने त्यावर आपण प्रतिक्रिया जाणीवपूर्वक दिली नाही अशी कोपरखिळीही त्यांनी माजी आ. कोल्हे यांचे नाव न घेता शेवटी लगावली आहे.