जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आरोग्य हीच खरी संपत्ती”-पी.व्ही.पंडित

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

वर्तमान युगात शारीरिक व मानसिक आजार बळावत चाललेले असून प्रौढ व्यक्तींनी आपले जीवनमान सुधारणे करिता आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, आरोग्य सांभाळणे गरजेचे असून आरोग्य हीच खरी माणसाची संपत्ती आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव पी.व्ही.पंडित यांनी कोपरगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांनी गुरुकृपा संमेलनाचे आयोजन केले होते त्यावेळी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.

या प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिलीप दारूणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमात सन १९६८ ते १९७२ या कालावधीतील विज्ञान विभागाच्या प्रथम बॅचचे ३३ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे यांचा यथोचित सत्कार करून कॉलेज बद्दल ऋणानुबंध व्यक्त केले. मेळाव्याचे औचित्य साधून अनेक मित्र एकत्र आल्याने सर्वांनी महाविद्यालयाप्रती कृतज्ञता प्रकट केली. या प्रसंगी डॉ. देविदास रणधीर यांनी नुकतीच भूगोलशास्त्र विभागात पीएच.डी. मिळविल्याबद्दल उपस्थित मान्यवर व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य प्रा. वसंत गायकवाड व राम चौधरी यांनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा.रमेश झरेकर, डॉ.सुभाष रणधीर व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.आर.जी.पवार यांनी केले, सूत्रसंचलन प्रा.सौ.बिरारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण कोऱ्हाळकर यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close