जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संपाची दखल न घेतल्यास बेमुदत संप- माध्यमिक शिक्षक संघाचा इशारा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक कर्मचारी समन्वय समिती व कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यात नुकताच एक दिवसीय संप आयोजित करण्यात आला होता. लाक्षणिक संपातील मागण्याची दखल घेण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.त्यात या आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी व अंशदायी पेन्शन योजना रद्द केली जावी,केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावी व ३३ वर्षे सेवेची अट रद्द करावी,कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तत्काळ भरावीत, केंद्रा प्रमाणे सर्व भत्ते लागू करावेत,अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट करावी,केंद्रा प्रमाणे महिला कर्मचारी यांना प्रसूती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करणे, राज्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदोन्नती शैक्षणिक पात्रतेनुसार करण्यात यावी,राज्यातील शिक्षण व आरोग्य यांचेवर जीडीपीच्या ६ टक्के खर्च करण्यात यावा व आरोग्य सेवेचे खाजगीकरण बंद करण्यात यावे. सर्व कर्मचारी यांच्या अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नयेत, वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट सरसकट लागू करा,पदवीधर शिक्षकांना माध्यमिक वेतनश्रेणी लागू करा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध लागू करून भरती सुरू करा.

यावेळी या माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यात सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीबाबत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अन्य आर्थिक आणि सेवाविषयक बाबींबाबत दोन्ही सरकार उदासीन असून त्यामुळे भविष्यात लढा अधिक तीव्र केला जाईल’ असा इशारा कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विलास वाकचौरे, सरचिटणीस नरेंद्र ठाकरे, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर,जिल्हा प्रतिनिधी रामदास गायकवाड,उपाध्यक्ष भगवान शिंदे,सहकार्यवाहक सुरेश वाबळे,सहचिटणीस मनोहर म्हैसमाळे,हिशोब तपासणीस दिलीपराव तूपसैंदर, ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन शेटे, कोपरगाव तालुका टीडीएफ संघटनेचे अध्यक्ष कर्णासाहेब शिंदे, कोपरगाव तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण निळकंठ तसेच कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे आजी-माजी पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक आदी उपस्थित होते.यावेळी मनिषा कुलकर्णी नायब तहसीलदार कोपरगाव यांना निवेदन देण्यात आले, प्रसंगी तालुकाभरातील मोठ्या संख्येने माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.

त्यावेळी तेरा मागण्या आपल्या निवेदनात या संघटनेने आपल्या निवेदनात केल्या आहेत.त्यात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी व अंशदायी पेन्शन योजना रद्द केली जावी,केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावी व ३३ वर्षे सेवेची अट रद्द करावी,कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तत्काळ भरावीत, केंद्रा प्रमाणे सर्व भत्ते लागू करावेत,अनुकंपा भरती तत्काळ व विनाअट करावी,केंद्रा प्रमाणे महिला कर्मचारी यांना प्रसूती, बालसंगोपन रजा व अन्य सवलती लागू करणे, राज्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदोन्नती शैक्षणिक पात्रतेनुसार करण्यात यावी,राज्यातील शिक्षण व आरोग्य यांचेवर जीडीपीच्या ६ टक्के खर्च करण्यात यावा व आरोग्य सेवेचे खाजगीकरण बंद करण्यात यावे. सर्व कर्मचारी यांच्या अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढण्यात यावी, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येवू नयेत, वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट सरसकट लागू करा,पदवीधर शिक्षकांना माध्यमिक वेतनश्रेणी लागू करा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध लागू करून भरती सुरू करा.आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close