कोपरगाव तालुका
चैताली काळे,डॉ.शेफाली भुजबळ यांना “जीवनगौरव पुरस्कार”
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव येथील नगर जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे व मुंबई एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त डॉ.शेफाली भुजबळ या दोघीना “सावित्रीबाई फुले जीवनगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला त्याचे वितरण शुक्रवार दि.१० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे महात्मा फुले परिषदेचे अध्यक्ष किरण झोडगे व महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त रामदास डोके यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे हे राहणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या कार्यक्रमास राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,अड्,जयंत जोशी, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे,साई संस्थानचे माजी विश्वस्त प्रभाकर बोरावके,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, कैलास ठोळे,चंद्रकांत ठोळे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्षा सुधाताई ठोळे यांनी केले आहे.