जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मुलांबरोबर संवाद साधणे ही पालकांची जबाबदारी -साधना जाधव

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)
आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांचा आपल्या मुलांबरोबर संवाद असला पाहिजे त्यामुळे मुलांमधे एकलकोंडेपणाची भावना निर्माण होणार नाही तसचे त्यांच्या छोटया समस्यांचे निराकरण करता येईल.म्हणुन पालकांनी मुलांबरोबर संवाद साधण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असे प्रतिपादन इफकोच्या संचालिका साधना जाधव यांनी कोपरगांव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

व्यायामाने शारिरीक बळ मिळते तर शिक्षणाने बौध्दिक बळ प्राप्त होते आपली भाषा संस्कृत ही सर्वांनी शिकावी यासाठीच विदयालयात इ.1 ली पासुन संस्कृत शिकविले जात असून भगवदगीतेचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे -मोहनराव चव्हाण

कोपरगाव शहरानाजीक असलेल्या संत जनार्दन स्वामी महर्षी स्कुलमध्ये 22व्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उदघाटन साधना जाधव यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे संस्थापक मोहनराव चव्हाण हे होते.

सदर प्रसंगी कोपरगांव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन,रोहिदास होन, विदयालयाचे विश्वस्त बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका जयश्री दरेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, शाळेतील संस्कार हे विदयाथ्र्यांना एक जागत्क नागरिक बनवतात. विदयार्थ्यांनी टि.व्ही तसेच मोबाइल समोर वेळ वाया घालविण्यापेक्षा व्यायामाला महत्व दयावे तसेच मुलीनीं स्वरक्षनाचे धडे घेतले पाहीजे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

प्रसंगी विदयालयाचे संगीत शिक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली समुहा गीताने उपस्थिंताची दाद मिळविली. तसेच विदयार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कार सादर केले. विदयार्थ्यांनी विविध वस्तु व खादय पदार्थांचे दुकाने मांडुन व्यवहारीक ज्ञान मिळविले. प्रसंगी उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयाचे प्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्वप्नील पाटील, संतोष चव्हाण, शादमीन सय्यद, वनिता औताडे तर आभार अनिल भागवत यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वश्री विनायक सांगळे, स्वप्नील पाटील, अनिल गायकवाड, शाम बच्छाव, राहुल नाईकवाडे यांसह सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close