जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माहेगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने आ. आशुतोष काळे यांची पेढेतुला  

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कुंभारी-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आ. आशुतोष काळे यांची माहेगाव देशमुख ग्रामस्थांच्या वतीने दत्त देवस्थान येथे आज ह. भ.प.काशिनाथ महाराज हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत पेढेतुला करण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात संपन्न झाली या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसभा मतदारसंघात हि निवडणूक मोठ्या अटीतटीत संपन्न होऊन त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आ. आशुतोष काळे हे ८२२ मतांनी विजयी झाले होते.त्यावेळी निवडणुकीच्या धामधुमीत माहेगाव देशमुख येथील ग्रामस्थांनी दत्त देवस्थान येथे नवस कबुल करून आशुतोष काळे विजयी झाले तर या देवस्थानात त्यांची पेढीतूला करण्याचे ठरविले होते.या निवडणुकीत आ. काळे विजयी झाल्याने आज सकाळी पेढीतूला करण्यात आली होती.

राज्याच्या विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात संपन्न झाली या निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसभा मतदारसंघात हि निवडणूक मोठ्या अटीतटीत संपन्न होऊन त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आ. आशुतोष काळे हे ८२२ मतांनी विजयी झाले होते.त्यावेळी निवडणुकीच्या धामधुमीत माहेगाव देशमुख येथील ग्रामस्थांनी दत्त देवस्थान येथे नवस कबुल करून आशुतोष काळे विजयी झाले तर या देवस्थानात त्यांची पेढीतूला करण्याचे ठरविले होते.या निवडणुकीत आ. काळे विजयी झाल्याने आज सकाळी पेढीतूला करण्यात आली होती.

याप्रसंगी माजी आमदार अशोक काळे,स्नेहलताई शिंदे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, संभाजीराव काळे, पंचायत समिती सदस्य अर्जुनराव काळे, सोसायटीचे अध्यक्ष रविंद्र काळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राधाकिसन काळे, के. पी. रोकडे, माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, पोलीस पाटील विक्रांत काळे,माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच सोसायटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व माहेगाव देशमुख, कुंभारी, कोळपेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, निवडून आल्यानंतर विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करावे लागेल अशी परिस्थिती होती. मात्र माजी आ.काळे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असतांना केलेली विकासकामे डोळ्यासमोर असल्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार असूनही विकास करून दाखवणारच अशी मनात खुणगाठ बांधलेली होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या किमयेमुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काम करायला संधी मिळाली आहे यामध्ये कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मतदारांप्रमाणेच माहेगाव देशमुख ग्रामस्थांचा देखील वाटा आहे. मतदार संघाचे अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. यामध्ये शेतीच्या पाण्याच्या व रस्त्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळेच पहिल्याच अधिवेशनात शेतीच्या पाण्याचा प्रश्न मांडला असून माजी आ. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न मार्गी लावणार आहे. मतदार संघातील अनेक रस्ते नकाशावर नाहीत. हे रस्ते नकाशावर आणून निधि मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असून विकासाच्या बाबतीत आमदार निधी व्यतिरिक्त निधी मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close