जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

नागरी पतसंस्थेची फसवणूक…त्या आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकारी पतसंस्था चळवळीत अग्रणी असलेल्या कोपरगाव शहरातील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कोपरगाव शाखेतून डंपर खरेदीसाठी बनावट कागदपत्रे करून एकवीस लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून त्याची विल्हेवाट लावल्याचा आरोप असलेल्या सात आरोपी पैकी विवेक अरुण उगले रा.साईली रोहाऊस आनंदनगर नाशिक यास कोपरगाव शहर पोलिसांनी नुकतीच अटक करून त्यास कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी विवेक उगले यास कारागृहातून बाहेर काढून त्याच्याकडे विचारपूस केली असता तो पोलिसांना मदत करत नसल्याचे आढळून आले.सदर गुन्ह्यात कर्ज मंजूर करण्यासाठी कोणकोणती बनावट कागदपत्रे तयार केली.ती कोठून केली त्यासाठी कोणी-कोणी मदत केली ? हे अद्याप उघड होत नसल्याने त्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.सदर आरोपी हा एजंट म्हणून काम करत होता.त्याने शिर्डी व येवला येथील शाखेत बनावट कर्ज प्रकरणात कर्जदार यांना मदत केली असल्याचा उघड झाले असून अजून अशी किती बनावट कर्जे आहेत याचा तपस करणे गरजेचे आहे.त्यास हि बनावट कागदपत्रे तयार करताना कोणी-कोणी मदत केली.ती कोठे तयार केली आदी गोष्टींचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगून पाच दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शहरांत समता नागरी सहकारी पतसंस्थेची मुख्य शाखा असून या ठिकाणी नाशिक येथील आरोपी फैज आरिफ खान,सातपूर निलेश साहेबराव पवार, किरण दिलीप वैचाळे अशोकनगर, सोनाली साहेबराव पवार,विवेक अरूण उगले साहेबराव पवार, गौरव प्रमोद कुलकर्णी आदींनी २४ जुलै २०१९ आदी आरोपीनी संगनमत करून समता नागरी पतसंस्थेतून “भारत बेंझ” कंपनीचा डंपर खरेदी करण्यासाठी त्या कंपनीचे सबडीलर के.जी.बी.अटो शोरूमची जमा पावती, अंदाजपत्रक,विमा, शोरूमचे खाते,अशी बनावट कागदपत्रे तयार करून २१ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले व वाहन खरेदी न करता स्वतःच्या फायद्या करिता वापरून पतसंस्थेची फसवणुक केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात ३० ऑक्टोबर २०१८ रोजी पतसंस्थेचे अधिकारी योगेश साहेबराव मोरे यांनी गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा कोपरगाव पोलीस तपास करत असताना यातील आरोपी क्रमांक १ फैज अरिफखान हा ताब्यात असताना विचारपूस केली असता सदरच्या फसवणुकीच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी एजंट आरोपी विवेक अरुण उगले याने मदत केल्याचे सांगितले.कोपरगाव पोलिसांनी त्याला आरोपी करून त्यास ताब्यात घेण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी तजवीज केली असता सदर गुंह्यातील आरोपी विवेक उगले यास ताब्यात घेण्यास नाशिक येथील नाशिक इंदिरानगर येथील पोलीस पथकास सांगितले असता त्यांनी या आरोपीस ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा ताब्यात घेतले होते त्यास त्यानंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयांत आणून त्याची वैद्यकीय तपासणी करून अटक केली होती.आरोपीला कारागृहातून बाहेर काढून त्याच्याकडे विचारपूस केली असता तो पोलिसांना मदत करत नसल्याचे आढळून आले.सदर गुन्ह्यात कर्ज मंजूर करण्यासाठी कोणकोणती बनावट कागदपत्रे तयार केली.ती कोठून केली त्यासाठी कोणी-कोणी मदत केली ? हे अद्याप उघड होत नसल्याने त्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.सदर आरोपी हा एजंट म्हणून काम करत होता.त्याने शिर्डी व येवला येथील शाखेत बनावट कर्ज प्रकरणात कर्जदार यांना मदत केली असल्याचा उघड झाले असून अजून अशी किती बनावट कर्जे आहेत याचा तपस करणे गरजेचे आहे.त्यास हि बनावट कागदपत्रे तयार करताना कोणी-कोणी मदत केली.ती कोठे तयार केली आदी गोष्टींचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगून पाच दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती.न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी विवेक उगले यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील एस.ए.व्यवहारे यांनी काम पाहिले. या खटल्याकडे कोपरगावसह नगर, नाशिक जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close