जाहिरात-9423439946
निवड

कोपरगाव तालुक्यात उपसरपंच निवडीचा दुसरा टप्पा पडला पार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या बक्तरपूर,बहादरपूर,डाऊच बु.च्या सरपंच पदाबरोबरच या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदही या गटाकडे आले असून करंजीचे उपसरपंचपद देखील या गटाने ओढून आणले आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नव्याने नियुक्त झालेल्या उपसरपंच पदाधिकाऱ्यांत बक्तरपूरच्या उपसरपंचपदी कमलाबाई काशिनाथ सानप,बहादरपूरच्या उपसरपंचपदी रामनाथ रखमा पाडेकर,डाऊच बु.उपसरपंचपदी भिवराज मार्तंड दहे यांची निवड झाली असून करंजीच्या उपसरपंचपदी शिवाजी कारभारी जाधव यांची निवड झाली आहे.त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात निवडणुकीत जनतेतून सर्वाधिक १५ सरपंच राष्ट्रवादी गटाचे तर भाजपचे ९ निवडून आले आहेत.यात पहिल्या टप्प्यात काल ग्रामपंचायतीपैकी १३ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक पार पडली असताना आज दुसऱ्या टप्प्यातील बहादरपूर सह ०८ ग्रामपंचायतींची उपसरपंच निवडणूक पार पडली आहे.यात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बहादरपूरसह करंजी,बक्तरपुर,डाऊच बु.आदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणूक उत्साहात संपन्न झाली असुन या ठिकाणी राष्ट्रवादीने बाजी मारली असल्याची माहिती आ.काळे यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून दिली आहे.

यामध्ये बक्तरपूरच्या उपसरपंचपदी कमलाबाई काशिनाथ सानप,बहादरपूरच्या उपसरपंचपदी रामनाथ रखमा पाडेकर,डाऊच बु.उपसरपंचपदी भिवराज मार्तंड दहे यांची निवड झाली असून करंजीच्या उपसरपंचपदी शिवाजी कारभारी जाधव यांची निवड झाली आहे.याबरोबरच आ.आशुतोष काळे गटाकडे २६ ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत १५ सरपंच व आजपर्यंत १२ उपसरपंच झाले असून उद्या दि.३१ डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या अंतिम उपसरपंचाच्या निवडीतून हि संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.सर्व नवनिर्वाचित उपसरपंचांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close