जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जिरायती गावांसाठी स्वतंत्र महसूल मंडळ होण्यासाठी प्रयत्न करणार – आ. आशुतोष काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सत्ता बदल झाल्यापासून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्व सदस्य प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. विधानसभा निवडणुकीत माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची परतफेड विकास कामातून करणार असून पोहेगाव जिल्हा परिषद गटातील १३ जिरायती गावांसाठी स्वतंत्र महसूल मंडळ स्थापन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे एका कार्यक्रमाप्रसंगी दिली आहे.


ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेल्या जवळके जिल्हा परिषद शाळेच्या नूतन खोलीचे उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, जवळकेचे सरपंच श्री थोरात, राहुल रोहमारे, रावसाहेब थोरात,भास्कर थोरात, ह.भ.प.भास्कर गव्हाणे, ज्ञानदेव नेहे, नाना नेहे, ज्ञानेश्वर गव्हाणे, साहेबराव कांडेकर, कचरू कांडेकर, भाऊपाटील गुंजाळ, गणेश थोरात, युवराज गांगवे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जवळके व रांजणगाव परिसरातील गावांसाठी महत्वपूर्ण असलेली उजनी चारी सिंचन योजना माजी आ.अशोक काळे यांच्या काळातील असल्याचा दावा (?) करून हि योजना सुरु राहण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून निळवंडे कालव्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास उपस्थितांना दिला आहे. पाणीपुरवठा व रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रथम प्राधान्य देणार आहे. रस्ते नकाशावर असल्यास निधी मिळण्यासाठी अडचणी येत नाही त्यासाठी सर्व रस्ते नकाशावर येतील त्यासाठी प्रयत्न करावे. सार्वजनिक विकास कामांचे प्रस्ताव पाठवावे हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचलन रावसाहेब थोरात यांनी केले. तर आभार थोरात यांनी मानले.

.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close