कोपरगाव तालुका
कोपरगाव साखर कामगार सभेच्या जनरल सचिवपदी गुरसळ
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका कामगार सभेच्या जनरल सचिवपदाच्या निवडणुकीत नितीन भास्करराव गुरसळ यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष कुलकर्णी यांना पराभवाची धूळ चारत जनरल सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.
कोपरगाव तालुका साखर कामगार सभेची निवडणूक नुकतीच कान्हेगाव येथील सोमय्या कारखान्यावर पार पडली आहे. या निवडणुकीत कोळपेवाडी, संजीवनी, सोमय्या, गणेशनगर, चांगदेवनगर, लक्ष्मीवाडी, साकरवाडीच्या युनियन प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये जनरल सचिव पदासाठी नितीन भास्करराव गुरसळ व सुभाष कुलकर्णी यांच्यात मुख्य लढत झाली. एकूण १४२ मतदारांपैकी १३९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. हि निवडणुकप्रक्रिया पार पडण्यापूर्वी कोपरगाव तालुका साखर कामगार सभेच्या अध्यक्षपदी वेनुनाथ बोळीज यांची बिनविरोध निवड झालेली आहे. त्यानंतर जनरल सचिवपदासाठी हि निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये नितीन गुरसळ यांना १३९ पैकी १०१ मते मिळवून विजयी झाले व सुभाष कुलकर्णी यांना अवघे ३४ मते मिळाल्यामुळे त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागते आहे. चार मते बाद होवून ६७ मतांनी नितीन गुरसळ यांनी सुभाष कुलकर्णी यांचा पराभव केला. या निवडणुकीत संजय वारुळे खजिनदार, वीरेंद्र जाधव व सतीश आवारे कायदेशीर सल्लागार व चांगदेवनगर शाखेच्या सचिवपदी मथुराबाई गायकवाड निवडून आले आहेत. या निवडणुकीत कामगार विकास मंडळाचे एकून ७० सदस्य उभे होते त्यापैकी ६९ सदस्य निवडून आले आहेत अशी माहिती जनरल विजयी झालेले नितीन गुरसळ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.