कोपरगाव तालुका
श्री.गंगागिरी महाराज महाविद्यालयात २ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात स्व.सुशीलाबाई काळे यांचे स्मरणार्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन दि. २ व ३ जानेवारी संपन्न होत असल्याची माहिती प्राचार्य एस.आर.थोपटे यांनी दिली आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदर स्पर्धेचे हे १९ वे वर्ष असून गेली १८ वर्षापासून महाविद्यालयामध्ये या स्पर्धेचे आयोजन होत आहे. कै.सुशीलाबाई काळे यांचा गौतम एज्युकेशन सोसायटी, शिक्षण क्षेत्राशी तसेच महाविद्यालयाशी सतत संबंध होता. त्यांच्या स्मृतीचा सुगंध न संपणारा आहे हा स्मृती ठेवा पणतीच्या रुपाने उच्च शिक्षण क्षेत्रात जपावा या भावनेतून व काळे कुटुंबियांच्या सहकार्यातून सदर स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.सदर स्पर्धेचे उद्घाटन साहित्यिक, आमदार लहू कानडे, रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे, आ.आशुतोष काळे,पुष्पाताई काळे, नितीन कोल्हे, व सुनील जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तर सदर स्पर्धेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजसेवक प्रा. अशोक सोनवणे हे असून अध्यक्ष म्हणून माजी आ.अशोक काळे हे उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाला कलावतीताई कोल्हे,चैताली काळे,सुनीता जगताप यांची उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेचे विषय-‘मला हवे आहेत आदर्श..,पराधीन आहे भूमिपुत्र माझा,स्मार्ट इंडिया उध्वस्त खेडी,आर्थिक मंदी कोणाची चंदी ?,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुल्यांची शतकोत्तर वाटचाल,एक समर्पनशील त्यागमूर्ती – कै.सुशीलाबाई काळे,बहुआयामी व्यक्तिमत्त्व कर्मवीर शंकरराव काळे,चला माणूस बांधूया… हृदय संवाद साधुया..” आदी आहेत.या स्पर्धेचे परीक्षण ५० गुणांचे असून प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त स्पर्धकांना क्रमश:९००१,७००१,५००१,१००१ अशी बक्षिसे,स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र देण्यात येणार आहेत.या शिवाय प्रथम विजेत्या महाविद्याल्यास सांघिक फिरता चषक देण्यात येणार आहे.कर्मवीर शंकरराव काळे या विषयावर सर्वोत्कृष्ट बोलणाऱ्या स्पर्धकास रु.१००१ चे स्वतंत्र पारितोषिक दिले जाईल.सदर स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार दि.२ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वा.होणार आहे तर पारितोषिक वितरण शुक्रवार दि.३ जानेवारी दुपारी ३.३० वा.होत असल्याने या स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयाने दोन स्पर्धक पाठविण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.एस.आर थोपटे यांनी केले आहे व स्पर्धेबाबत अधिक माहिती सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे,डॉ.सुरेश काळे,डॉ.राजाराम कानडे,प्रा.बाबासाहेब वाघ,प्रा.छाया शिंदे,डॉ.माधव यशवंत,प्रा.चित्रा करडे,प्रा.विजय रोहम,प्रा.रामदास मुंगसे,प्रा.प्रकाश सावंत,प्रा.कलावती देशमुख यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.