जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अवैध मांजाची विक्री,कोपरगावात एकावर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिक,प्राणी,पक्षी,यांना इजा पोहचविणाऱ्या मांज्याची अवैध विक्री केल्या प्रकरणी कोपरगाव शहरातील गोरोबानगर येथील इसम रवींद्र अण्णा वाघ (वय-२७) यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केल्याने अवैध मांजा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान कोपरगावात पंधरा दिवसांपूर्वी संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांचा धारणगाव रस्त्यावर गळा कापला होता तर कोपरगाव बेट भागात एका दुचाकी स्वाराचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.राज्यातही अशा अनेक घटना घडल्या होत्या.मात्र कोपरगाव शहरात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी या बाबत पोलीस अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली होती.या कारवाईचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

चिनी मांजा तथा नायलॉन मांजा पतंगासाठी वापरल्याने या धाग्याने प्राणी,पशु ,पक्षी यांना इजा पोहचून जीवितास धोका निर्माण होऊन प्रसंगी जीवही जातो त्यामुळे मांजासाठी वापरला जाणाऱ्या नायलॉन धाग्यास राज्य शासनाने निर्णय क्रं. सी.आर.टी.२००५ /प्र. क्र./३७ ता./तां. क्रं.-२ दि. १८ जून २०१६ पासून प्रतिबंध घातलेला आहे.हे माहित असतानाही कोपरगाव शहरातील गोरोबानगर येथील इसम रवींद्र अण्णा वाघ याने आपल्या फायद्यासाठी नायलॉन धाग्याची विक्री करून इतरांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचे काम केले आहे.हि बाब कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ.अंबादास रामनाथ वाघ (वय-३२) यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ४१८/२०१९ भा.द.वि.कलम १८८.३३६ सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध अटकेची कारवाई केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.दरम्यान कोपरगावात पंधरा दिवसांपूर्वी संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांचा धारणगाव रस्त्यावर गळा कापला होता तर कोपरगाव बेट भागात एका दुचाकी स्वाराचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.राज्यातही अशा अनेक घटना घडल्या होत्या.मात्र कोपरगाव शहरात पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी या बाबत पोलीस अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली होती.या कारवाईचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close