कोपरगाव तालुका
अनावश्यक वृक्षतोड थांबवा-वन परिक्षेत्र अधिकारी जाधव
संपादक-नानासाहेब जवरे
कुंभारी-(प्रतिनिधी)
वर्तमान काळात वृक्षतोड वाढल्याने पर्यावरणाचा समतोल मोठ्या प्रमाणावर बिघडला असून त्याचे वर्तमान काळात आपण परिणाम भोगत असून अवकाळी पाऊस पाठ सोडण्यास तयार नाही तर हिवाळा हा ऋतू सुरु होऊन निम्मा कालखंड संपला असताना अद्याप थंडीचा मागमूसही दिसत नाही त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ग्रामस्थांनी अनावश्यक वृक्ष तोड थांबवावी असे आवाहन कोपरगाव येथील वन परिक्षेत्र अधिकारी एम.एस.जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.
निसर्गात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचे विपरीत परिणाम आता सर्वत्र दिसू लागले आहे.या अवाजवी हस्तक्षेपामुळे सजीव सृष्टी धोक्यात आली आहे.निसर्गा कडून आम्ही वारेमाप वसूल करत असल्याने निसर्गाचा समतोल ढळला आहे.परिणाम आता जाणवू लागले आहे.त्यामुळे आता इमारती व तत्सम कामासाठी अन्य पर्यायांचा वापर केला पाहिजे.
निसर्गात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचे विपरीत परिणाम आता सर्वत्र दिसू लागले आहे.या अवाजवी हस्तक्षेपामुळे सजीव सृष्टी धोक्यात आली आहे.निसर्गा कडून आम्ही वारेमाप वसूल करत असल्याने निसर्गाचा समतोल ढळला आहे.परिणाम आता जाणवू लागले आहे.त्यामुळे आता इमारती व तत्सम कामासाठी अन्य पर्यायांचा वापर केला पाहिजे.सरपणासाठी वृक्षतोड टाळली पाहिजे त्यासाठी अन्य सौर ऊर्जा,विद्युत ऊर्जा,गॅस आदींचा वापर वाढवला पाहिजे.आज सर्वच सजीवसृष्टी धोक्यात आली आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी विनापरवाना वृक्षतोड टाळावी.धोकादायक असतील तेच वृक्ष तोडावे वृक्ष तोड आवश्यकच असेल त्यावेळी वन विभागाची परवानगी घ्यावी.विना परवाना वृक्षतोड करू नये.लाकडाची वाहतूक करताना त्या बाबत वनविभागाची परवानगी घेऊनच ती करावी अन्यथा वनविभाग कारवाई करील असे आवाहन वनक्षेत्रपाल एम.एस.जाधव यांनी शेवटी केले आहे.