कोपरगाव शहर वृत्त
शेतकऱ्यांना हमी भावाऐवजी लाठी हल्ला; हेच भाजपचे शेतकरी प्रेम-उद्धव ठाकरे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतमालाच्या किमान हमी भावाला कायद्याची गॅरंटी मिळावी,यासारख्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत.या शेतकरी आंदोलनाला पंजाब-हरियानाच्या शंभू सीमेवर मंगळवार दि.१३ फेब्रुवारी हिंसक वळण लागले.शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये दाखल होण्यापूर्वी सरकारने त्यांना डॉ.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दर देणे गरजेचे असतांना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या हेच का तुमचे शेतकरी प्रेम; ”जय जवान,जय किसान” म्हणत भाजपने शेतकऱ्यांवर केलेला हल्ला शेतकरी कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

“जे पोलीस बळ सीमेवर शत्रूवर गोळ्या घालायला उभे करायला हवे ते तुम्ही शेतकऱ्यांविरुद्ध उभे करत असून हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहे ? असा सवाल सत्ताधारी भाजपला केला व हि कुठली लोकशाही आहे.तुम्हाला शेतकरी केवळ मते घेण्यापूरते लागतात; तुम्ही आम्हाला मत दिले आता तुमची गरज संपली आता आम्ही आमच्या सुटाबुटातील मित्रांचे खिसे भरणार असे त्यांचे भाजपचे धोरण आहे”-उद्धव ठाकरे,माजी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काल पासून अ.नगर जिल्हा दौरा सुरू झाला होता.आज दौऱ्याचा दुसरा व शेवटचा दिवस होता त्याची सुरुवात कोपरगाव पासून सकाळी साडे दहा वाजता करण्यात आला आहे.प्रारंभी त्यांनी छत्रपतीस शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना हार अर्पण करून तालुक्यातील जनतेशी डॉ.आंबेडकर यांच्या मैदानावर ‘संवाद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत,शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे,विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,सेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे,माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,तालुका प्रमुख बाळासाहेब रहाणे,शहर प्रमुख सनी वाघ,माजी शहर प्रमुख भरत मोरे,कलविंदर दडियाल,माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे,माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,श्रीरंग चांदगुडे,रावसाहेब टेके आदीसंह मोठ्या संख्येने शिवनसैनिक व नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी वाईट कशी ठरवतात अशी विचारणा करून ज्यांच्या विरुद्ध तुम्ही काटेरी कुंपण उभे केले व त्यांच्यावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहे.ती याच शेतकऱ्यांची मुले असून त्यांना आपापसात लढवले जात असल्याचा आरोप केला आहे.जे पोलीस बळ सीमेवर शत्रूवर गोळ्या घालायला उभे करायला हवे ते तुम्ही शेतकऱ्यांविरुद्ध उभे करत असून हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहे ? असा सवाल सत्ताधारी भाजपला केला व हि कुठली लोकशाही आहे.तुम्हाला शेतकरी केवळ मते घेण्यापूरते लागतात असा आरोप केला आहे.तुम्ही आम्हाला मत दिले आता तुमची गरज संपली आता आम्ही आमच्या सुटाबुटातील मित्रांचे खिसे भरणार असे त्यांचे भाजपचे धोरण असल्याचा आरोप केला आहे.निवडणूक आली की,”मेरे प्यारे देशवासीयो”असे आवाहन करायला हे मोकळे.त्यावेळी त्यांनी भारत रत्नाचा बाजार भरला असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.डॉ.स्वामिनाथन असते व त्यांना हयातीत जर भारतरत्न दिले असते तर आनंद वाटला असता.त्यांच्या हयातीत,”आम्ही त्यांना राष्ट्रपती करा” अशी मागणी आम्ही केली होती असा दावा केला व त्यावेळी त्याकडे भाजपने कानाडोळा केल्याचा आरोप केला आहे.व त्यांच्या निर्वाणानंतर त्यांना,’भारत रत्न’ पुरस्कार देऊन त्यांचे अवमूल्यन केले असल्याचा आरोप केला आहे.’भारत रत्न’ हि खरी आमची समोर बसलेली जनता असून त्यांचे खरे कौतुक केले पाहिजे असे आवाहन केले आहे.
सदर प्रसंगी त्यांनी ज्या डॉ.आंबेडकर यांनी घटना लिहिली आज ती धोक्यात असल्याचा आरोप केला आहे.त्यांना हे समजल्याने आज मुस्लिम समाज आमच्या बरोबर असल्याचा दावा केला आहे.आता अशी वेळ आली आहे की,”आता खरा तिरंगा हाती घेण्याची वेळ आली असनू मागे गावोगाव भाजपचे रथ आले त्यावेळी त्यावर ‘भारत सरकार’ असे नाव नव्हते तर ‘मोदी सरकार’ असे नाव होते.तुम्ही आमच्या देशाचे नाव बदलले का ? असा तिरका सवाल भाजपवाल्याना केला आहे.आगामी निवडणुकीत जर त्यांना निवडून दिले तर हे देशाचे नाव व देशाचा ध्वज बदलवतील असा आरोप आहे.भाजपचा फडके (झेंडा) त्यांनी धुणीभांडी करण्यासाठी वापरावे असे आवाहन केले आहे.आमच्या तिरंग्याला हात लावला तर जाळून खाक करू असा इशारा दिला आहे.व येथील उपस्थित नागरिकांचे कौतुक करून आगामी काळात येथे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा वाघच (माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे ) येतील असे स्पष्ट करून आपल्या भाषणाला विराम देऊन त्यांनी संगमनेरकडे कूच केले आहे.
प्रारंभी खा.संजय राऊत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले असून दोघांनी आपले भाषण आवरते घेतले होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शहर प्रमुख सनी वाघ यांनी मानले आहे.