जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राज्यात भाजपाची आयारामामुळे दुरवस्था-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात आज भारतीय जनता पक्षाची जी दुरवस्था झाली आहे ती पक्षात आलेल्या आयारामामुळे झाली असून आता तरी या पक्षास उध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तीना त्यांची जागा दाखवून द्यावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हा भाजपचे अध्यक्ष प्रा.भानूदास बेरड यांचेकडे केली आहे.

माजी आ.कोल्हे यांनी संघ व भाजपचे ५४ कार्यकर्त्यांना “विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून नावे येऊनही अखेरपर्यंत शासकीय शिक्के मिळू दिले नाही.आमदारकी,शिर्डी विश्वस्तपद कोल्हे यांच्याच घरात जातेच कसे. पक्षशिस्त या नावाखाली कुणीच बोलायचे नाही का ? आयारामांमुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाची दुरावस्था झाली हे खरे आहे कि नाही ?-विजय वहाडनेंचा सवाल

राज्यात आगामी कालखंडात पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रदेश भाजपने प्रयत्न सुरु केले आहे.शहर,तालुका व विधानसभा,मंडळ पातळीवर पदाधिकारी निवडीची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून कोपरगावसह अन्य तालुक्यात आज पदाधिकारी निवडीसाठी वरिष्ठ संघटक येणार असल्याची बातमी असून त्यांचे नियोजन संजीवनी सहकारी कारखान्यावर केल्याने कोपरगाव नगर परिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.व पक्षाच्या या धोरणावर सडकून टीका केली आहे.त्यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे कि,”आज कोल्हे यांच्या संजीवनी कारखान्यावर भाजपा पदाधिकारी निवड आहे,आम्ही कुणीही संजीवनीत हजेरी लावू शकत नाही.मागील निवडीच्या वेळीही कोल्हे यांनी मनमानी केली,सातत्याने जुन्या कार्यकर्त्यांना टाळले,एकनिष्ठ कार्यकर्ते डावलून सहकार सम्राटांच्या हातात संघटना देणे योग्य नाही.

दरम्यान या पदाधिकारी निवडीसाठी जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे हे पदाधिकारी आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.”भाजपने या निवडीसाठी सर्व सक्रिय सदस्यांची (जुने-नवे ) निवडीसाठी विचार केला असून शहराध्यक्ष पदासाठी नऊ तर तालुकाध्यक्ष पदासाठी सात जण इच्छुक असल्याची माहिती दिली असून आता पक्षात आलेल्यांना पाच वर्ष झाले असल्याने सर्व जण जुने झाले आहे.आता या निवडीवर एक मत झाले नसल्याने या निवडीची प्रक्रिया आता जिल्हासमितीपुढे सोपवणार आहे-सचिन तांबे

निवडीची तारीख बदलून कोपरगाव शहरात या निवडी घ्याव्यात.सहकार सम्राटांच्या ताब्यात पक्ष संघटना गेल्याने जिल्ह्यातील भाजपा संघटना कागदोपत्रीच दिसते.काल एन.आर.सी.ला पाठिंबा देण्यासाठी बैठक झाली,पण या बैठकीत कोल्हे परिवार गायब होता,अशांच्या हातात पक्ष संघटना देवू नये.यांनी पाच वर्षात पक्षवाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाही.त्यामुळे आम्हाला विचारात न घेता निवडी होणार असल्यास आम्ही आमचे पदाधिकारी लगेच जाहीर करणार आहोत,केवळ नाईलाजाने. आमच्या रक्तात संघ विचार असल्याने आम्ही पक्ष सोडू शकत नाही.पण डोळ्यादेखत पक्षात मनमानी होत असेल तर मला तरी बोलावेच लागेल.तालुक्यात कोल्हे यांनी त्यांची टोळी वाढविली या टोळीत भाजपा कुठे आहे ? असा सवाल विचारून याच माजी आ.कोल्हे यांनी संघ व भाजपचे ५४ कार्यकर्त्यांना “विशेष कार्यकारी अधिकारी” म्हणून नावे येऊनही अखेरपर्यंत शासकीय शिक्के मिळू दिले नाही.आमदारकी,शिर्डी विश्वस्तपद कोल्हे यांच्याच घरात जातेच कसे. पक्षशिस्त या नावाखाली कुणीच बोलायचे नाही का ?आयारामांमुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाची दुरावस्था झाली हे खरे कि नाही ? आम्हाला जाणीवपूर्वक सक्रिय सदस्य होऊ दिलेले नाही,आज संपन्न होत असलेल्या कोपरगाव शहर व तालुका मंडळाच्या निवडी रद्द करून नंतर घ्याव्यात,आम्ही १५० जण सक्रिय सदस्य होण्यासाठी तयार आहोत असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close