जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

न्यायालयातून गुन्हा मागे घेण्यासाठी एकास मारहाण,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील आरोपी मिलिंद बाबुराव भारूड,नितीन बबन भारूड,दीपक बबन भारूड,मैना बबन भारूड किरण मिलिंद भारूड आदी पाच आरोपीनी फिर्यादी महिला व अंगणवाडी सेविका रेखा सतिष भारूड (वय-३६)यांना व त्यांच्या पतीस लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने, बॅटीने व लाथा बुक्य्यांनी मारहाण केल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पढेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील फिर्यादी महिला या अंगणवाडी सेविका असून त्या पढेगाव येथील रहिवाशी आहेत.तक्रारदार रेखा भारूड यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आरोपीने विरुद्ध यापूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.१४८/२०१९ भा.द.वि.कलम ३५४,३४१,५०४,५०६ नुसार २४ एप्रिल २०१९ रोजी गुन्हा दाखल केलेला आहे.त्याची कोपरगाव न्यायालयात सुनावणी सुरु आहे.तो गुन्हा मागे घ्यावा या कारणासाठी वरील पाच आरोपीनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला व आपल्या पतीस लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने, बॅटीने व लाथा बुक्य्यांनी मारहाण करून आपल्याला गंभीर दुखापत केली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गु.र.नं.४१७/२०१९ भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री गवसने हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close