जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

देशात आता समान नागरी कायदा आणा-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्षांकडून रान उठवले जात असताना कोपरगावात नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चात,” देशातील परदेशी देशद्रोह्यांना बाहेर काढण्यासाठी नागरिकत्व कायदा आणाचं पण देशात आता समान नागरी कायद्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चा प्रसंगी केले आहे.

भारतीय नागरिकांना या कायद्याची भीती वाटण्याचे कोणतेही कारण नसताना साप-साप म्हणून भुई बडविण्याचे पाप कोण करत आहे व आपल्याच मालमत्तेचे नुकसान भारतीय नागरिक करूच शकत नाही.भारतीय मुसलमानांना या कायद्यापासून भिण्याचे कोणतेही कारण नाही.मात्र या देशात राहून परकीयांना कोणालाही मदत करता येणार नाही.त्यांना विरोधी पक्ष भडकावत असून त्यांनी त्यांच्या बहाकाव्यात येऊ नये.मात्र पाकिस्तान्यांना या देशात राहण्याचा कोणताही हक्क नाही.काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी जनतेत भांडणे लावण्याचे काम करत आहे-वहाडणे

नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक-२०१६ ’ याने १९५५ सालाच्या कायद्यात दुरूस्ती केले गेले, ज्याद्वारे या मुस्लिम देशांमधुन भारतात सीमा ओलांडून आलेल्यांना बेकायदेशीर स्थलांतरित मानले जाणार नाही – अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान,अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या बिगरमुस्लिम धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, ८ जानेवारी २०१९ रोजी लोकसभेत अखेर मंजूर झाले. ‘या विधेयकातील तरतुदी राज्यघटनेच्या विरोधात नाहीत. त्यामुळे या विधेयकास आसाममधून होत असलेला विरोध आणि धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्यास होत असलेला विरोध हा निराधार आहे. आसामच्या जनतेची परंपरा आणि संस्कृतीचे जतन करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असून, त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट करूनही विरोधी पक्षांनी नागरिकांमध्ये संभ्रम करण्याचे काम चालविल्याने देशात वातावरण अशांत बनले आहे.काही विशिष्ट लोक मोर्चे काढून व हिंसक कारवाया करून या नागरिकत्व कायद्याला विरोध करत असल्याने व हा कायदा चांगला असल्याने त्याच्या समर्थनार्थ आता मोर्चे निघू लागले असून आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भाजप व त्यांच्या समर्थकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून कोपरगाव तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता मोर्च्यांचे रूपांतर सभेत झाले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी मंजूर येथील आश्रमाचे प्रमुख श्री शिवानंदगिरी महाराज,भाजपचे प्रांतीय सदस्य रवींद्र बोरावके,वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय वाजे,भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात,मोदी विचार मंचचे शहराध्यक्ष विनायक गायकवाड,तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे.जेष्ठ नेते हरिभाऊ गिरमे,शहराध्यक्ष कैलास खैरे.सेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव,नगरसेवक सत्येन मुंदडा,विवेक सोनवणे,सरचिटणीस चेतन खुबाणी,मनसे चे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल,आदी प्रमुख मान्यवरांसह बहू संख्येने नागरिक उपस्थिय होते.

त्यावेळी त्यांनी भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांचा समाचार घेतला व त्यांना अभय देणाऱ्यांवर सडकून टीका केली.भारतीय नागरिकांना या कायद्याची भीती वाटण्याचे कोणतेही कारण नसताना साप-साप म्हणून भुई बडविण्याचे पाप कोण करत आहे व आपल्याच मालमत्तेचे नुकसान भारतीय नागरिक करूच शकत नाही.भारतीय मुसलमानांना या कायद्यापासून भिण्याचे कोणतेही कारण नाही.मात्र या देशात राहून परकीयांना कोणालाही मदत करता येणार नाही.त्यांना विरोधी पक्ष भडकावत असून त्यांनी त्यांच्या बहाकाव्यात येऊ नये.मात्र पाकिस्तान्यांना या देशात राहण्याचा कोणताही हक्क नाही.काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी जनतेत भांडणे लावण्याचे काम करत आहे.त्यांना रोखलेच पाहिजे असेही त्यांनी शेवटी आवाहन केले.

त्यावेळी शिवानंदगिरी महाराज,अड्.जयंत जोशी,रवींद्र बोरावके,बाळासाहेब जाधव,संतोष गंगवाल,सत्येन मुंदडा,आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व सरकारच्या धोरणांना पाठिंबा दर्शवला आहे.शेवटी आपल्या पाठिंब्याचे पात्र व मागण्याचे निवेदन कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे याना देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close