कोपरगाव तालुका
जि. प.सदस्य महेंद्र काले यांना मातृशोक
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(प्रतिनिधी)
नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य व बोकटे येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र केशरचंद काले यांच्या मातोश्री मैनाबाई काले (वय-९२) यांचे नुकतेच वृद्धपकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्यावर बोकटे येथील कालभैरव मंदिरानजिक शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पच्छात ३ मुले,२ मुली असा परिवार आहे.
स्व.मैनाबाई काले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला संसार उभा केला होता.आपल्या अपंत्यांना उच्च शिक्षण देऊन संस्कारित केले होते.त्या अत्यंत मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी राहाता नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र पिपाडा, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक श्री लोंढे, वैजापूर येथील मर्चंट बँकेचे संचालक श्री संचेती,येवला येथील अंबादास बनकर, आदींसह मोठ्या संख्येने आप्तस्वकीय व नागरिक,महिला उपस्थित होत्या.