कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे ,कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.याचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
करंजी येथील कर्मवीर काळे विद्यालयाच्या प्रांगणात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात विद्यालयातील पंचावन्न विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची खाद्यपदार्थ ,भाजीपाला , कडधान्य ,फळफळावळ, स्टेशनरी इत्यादींची विक्री स्टॉल उभारली होती.या मेळाव्याच्या माध्यमातून साधारणतः तीन ते चार हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर माळी यांनी सांगितले आहे.
या बाल आनंद मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ढेपले,स्थानिक शाळा समितीचे डॉ. सूनील देसाई ,सांडू पठाण ,विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर माळी,नाथा आगवण, व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्याचे यशस्वी आयोजन विद्यालयातील शिक्षक चौधरी बी.बी. चव्हाण एस.डी.,सांगळे जी.डी. सौ.अनाप ए.एम.,वसावे व्ही.आर.,कांबळे पी.ए.,जगताप एल.पी., सरोदे ए.व्ही.,डोखे गवनाथ यांनी केले.