जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संत ज्ञानेश्वर स्कुलमध्ये क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानाजीक असलेल्या संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये शालेय क्रीडा महोत्सव २०१९-२० चे तीन दिवसीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन अहमदनगर जिल्हा क्रीडा व शारिरीक शिक्षण शिक्षक संघाचे सचिव मकरंद कोर्‍हाळकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आज पार पडले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक सुखदीपसिंग सहाणी हे होते.

किमान वयाच्या पंधराव्या वर्षा पासून विद्यार्थी-विद्यार्थिनीनी दररोज किमान पंचेचाळीस मिनीटे योगासने व व्यायाम करणे आवश्यक आहे त्यामुळे हृदय व शरीरयष्टी योग्य-उत्तम राहते व रोग प्रतिकार शक्ति वाढते. तसेच खेळामध्ये जय-पराजय हा होतच असतो त्यामुळे चिड-चिड करू नका वा खचून जाऊ नका-मकरंद कोऱ्हाळकर

सदर प्रसंगी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, स्कूलचे उपाध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक किरण भोईर, दिलीप सोनवणे, शाळेचे समन्वयक पोपट झुरळे, कार्यकारी संचालक विशाल झावरे,अॅड.शंकर यादव, शाळेचे प्राचार्य एस.एस.मोरे आदी मान्यवरांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी, माता-पालक,शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग बहूसंख्येने उपस्थित होते.

त्यानंतर आपल्या मनोगतात मकरंद कोर्‍हाळ्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, किमान वयाच्या पंधराव्या वर्षा पासून विद्यार्थी-विद्यार्थिनीनी दररोज किमान पंचेचाळीस मिनीटे योगासने व व्यायाम करणे आवश्यक आहे त्यामुळे हृदय व शरीरयष्टी योग्य-उत्तम राहते व रोग प्रतिकार शक्ति वाढते. तसेच खेळामध्ये जय-पराजय हा होतच असतो त्यामुळे चिड-चिड करू नका वा खचून जाऊ नका. आपल्या कुक्कूशेठ सहाणी त्याचे त्यांच्या भावी जीवनात होणारे महत्व समजाऊन संगितले व स्कूल व्यवस्थापनाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या सुरवात मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता सरस्वती, संत ज्ञानेश्वर माऊली, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांच्या पूजनाने करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.वसुधा पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close