जाहिरात-9423439946
आंदोलन

कोपरगाव शहरातील रस्त्याचा दोन दिवसात बोऱ्या,नागरिकांची तक्रार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत उपनगर असलेल्या सुभाषनगर येथील नुकताच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचा दोन दिवसात बोऱ्या वाजला असून सदर रस्ता पुन्हा एकदा नव्याने करून द्यावा अशी महत्वपूर्ण मागणी या भागातील शिवसेना नेते भैया तिवारी यांचेसह अन्य रहिवाशांनी केली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.त्याबाबत शहरातील नागरिकांत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

“वर्तमानात मुख्याधिकारी हेच प्रभारी अध्यक्ष व मुख्याधिकारी या दोन्ही पदावर कार्यरत असून नगरपरिषदेच्या सर्व कामांची जबाबदारी त्यांच्यावर असून त्यांना या निकृष्ठ कामांची जबाबदारी टाळता येणार नाही त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून सदर रस्त्याचे काम दुरुस्त करून द्यावे”-भैय्या तिवारी,शिवसेना नेते,कोपरगाव.

कोपरगाव नगर परिषद आणि निकृष्ठ काम यांचे कायम अतुट नाते असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.शहरातील सजग नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही यात फार काही सुधारणा झाल्याचे ऐकिवात नाही.सन-२०१६ अखेर झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी विजय वहाडणे यांची निवड झाली होती.त्या नंतर बऱ्याच अंशी त्यात सुधारणा झाली होती.मात्र त्यात शत-प्रतिशत सुधारणा झाली असे म्हणण्याचे धाडस कोणीही करणार नाही.त्यांनाही अनेक ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी अनेक वेळा चुना लावला असल्याचे उदाहरणे आहेत.त्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यानजीक केलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे उदाहरण ताजे आहे.त्यावर जनतेने आवाज उठवल्यावर त्यावर पुन्हा डांबरीकरणाचा मुलामा देण्याचा प्रताप पालिकेच्या बांधकाम विभागाने केला होता.असाच प्रकार येवला नाका येथील जलसंपदा विभागाच्या विश्राम विभागाच्या उत्तरेस असलेल्या ‘काळुआई मंदिरा’नजीक झाला होता.आता पुन्हा एकदा त्याची पुनरावृति झाली आहे.सुभाषनगर येथील रस्त्याची अशीच वाट लागली आहे.असल्याचे स्पष्ट झाले आहे.कोपरगावात राज्य परिवहन विभागाचे बस स्थानक हा भ्रष्टाचाराचा जिताजागता पुरावा निर्माण असताना ईशान्य गडाशी संबंधित माजी नगराध्यक्ष असलेल्या इसमाच्या नातेवाईक ठेकेदारांचे आणखी एक उदाहरण शहरात तयार झाल्याचे मानले जात आहे.

याबाबत सुभाषनगर येथील नागरिक आणि महिला यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे तक्रार केली असल्याचे उघड झाले आहे.
त्यांनी केलेल्या मागणीत म्हटलं आहे की,”प्रभाग क्रमांक ०८ मधील रस्ता नुकताच पालिकेच्या बांधकाम विभागाने केला असून दोन दिवसातच या रस्त्याचे होत्याचे नव्हते झाले आहे.सदर कॉंक्रिटीकरणातून लागलीच खडी व तत्सम साहित्य बाहेर पडत असून हे काम निकृष्ट झाल्याचा पुरावा हाती येत आहे.त्यामुळे सदर रस्ता आम्हाला पुन्हा एकदा पालिकेच्या बांधकाम विभागाने बनवून द्यावा.पंधरा वर्षातुन हा रस्ता पहिल्यांदा होत आहे.सदर रस्ता होताना गुणवत्ता नियंत्रणासाठी संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्ष थांबणे गरजेचे होते.मात्र तसेच काहीही घडले नाही.त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी स्वीकारून सदर ठेकेकदाराचे बिल अदा करून नये अशी मागणी संबंधित नागरिकांनी मुख्याधिकारी गोसावी यांच्याकडे शेवटी केली आहे.

सदर निवेदनावर शिवसेना नेते भैय्या तिवारी यांचेसह सविता त्रिभुवन,रफिक शेख,रेश्मा शेख,इसाक शेख,सुलताना रफिक शेख,शकीला अत्तार,शाईना अत्तार,नौशाद बागवान,शबाना अत्तार,झुंबरबाई शिंगोटे,शोभा खैरनार,रवी गोर्डे,दादाभाऊ गोर्डे,हिराबाई शिंदे आदींसह २७ नागरिकांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close