जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या महाविद्यालयात संयुक्त पूर्व परीक्षा मार्गदर्शन वेबीनार संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

“स्पर्धा परीक्षा या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या क्षमता,प्रयत्न व सातत्य यांची कसोटी पाहातात.म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना गोंधळून न जाता प्रामाणिक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पोलिस उपनिरीक्षक रूपाली भगत यांनी एक दिवशीय वेबिनार मध्ये बोलताना नुकतेच केले आहे.

के.जे.सोमैया महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असून महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विविध कार्यशाळा घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य दिशा दर्शवत असून विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळेल-डॉ.बी.एस.यादव.प्राचार्य सोमय्या महाविद्यालय.

कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागांतर्गत गुणवत्ता कक्ष व पिरॅमिड ॲकेडमी कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “पी.एस.आय.एस.टी.आय.,असिस्टंट पूर्व परीक्षांची तयारी” या विषयावर एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आले त्या वेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी पिरॅमिड ॲकॅडमीचे अध्यक्ष विकास मालकर व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संतोष पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेबीनार मध्ये पोलीस उपनिरीक्षक रूपाली भगत यांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले हे मार्गदर्शन सत्र मध्ये महाविद्यालयातील व परिसरातील एकूण १९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर त्यात ७६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता.

या महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव म्हणाले की,”के.जे.सोमैया महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असून महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विविध कार्यशाळा घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य दिशा दर्शवत असून विद्यार्थ्यांना नक्कीच यश मिळेल असा आशावाद शेवटी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.वसुदेव साळुंके यांनी प्रास्ताविक केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.रवींद्र जाधव यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा.विजय ठाणगे,कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे,ग्रंथपाल निता शिंदे,प्रा.आकाश सोनवणे यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close