जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय श्रेणी द्या- आ. आशुतोष काळें

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वाढणाऱ्या लोक संख्येच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये अत्यावश्यक सुविधांची कमी असून जिल्हा रुग्णालय हे कोपरगाव विधानसभा मतदार संघापासुन जवळपास १०० किलोमीटर दूर अंतरावर आहे शहरातील ग्रामीण रुग्णालयात सुविधा मिळत नसल्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामना करावा लागत असल्याने. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणी दर्जा व ट्रॉमा केअर सेंटर सुरु करा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना.जयंत पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय मतदार संघातील लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत असून कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्यास ३० बेडचे असलेले ग्रामीण रुग्णालय १०० बेडचे होईल. नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालय झाल्यास तज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध राहतील.

सोमवार पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे अर्थ व आरोग्यमंत्री जयंत पाटील यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय मतदार संघातील लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत असून कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्यास ३० बेडचे असलेले ग्रामीण रुग्णालय १०० बेडचे होईल. नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालय झाल्यास तज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध राहतील.उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग असल्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना एकाच छताखाली मिळण्यास मदत होईल. त्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रूग्णालय श्रेणी देण्यात यावी.कोपरगाव विधानसभा मतदार संघातून नगर-मनमाड राज्यमार्ग व नागपूर-घोटी मार्ग जात असून या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात. अपघातातील जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. कोपरगाव मतदार संघातील अनेक नागरिकांना मोठ्या आजारावरील उपचारासाठी नासिक, मुंबई आदी ठिकाणी खाजगी दवाखान्यात जावे लागते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. सर्वसामान्य नागरिकांना असे उपचार घेणे शक्य नाही त्यासाठी कोपरगावमध्ये लवकरात लवकर ट्रॉमा केअर सेंटर सुरु करावे अशी मागणी शेवटी आ. काळे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close