जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत सन-२०११ साली मार्च महिन्यात कळीचा मुद्दा ठरलेला ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ पुन्हा एकदा हाती घेण्यात येणार असून त्याचा ठराव नुकत्याच नगरपरिषदेच्या संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेच्या विषय क्रमांक-२४ अन्वये मंजूर झाला असून यावर सर्व पक्षांनी सर्वसंमतीने मंजुरीचा ठसा उमटवला आहे.त्यामुळे शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रणकंदन होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

ऐन वेळच्या विषयात कोपरगाव पंचायत समिती समोर माजी खासदार स्व.शंकरराव काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उभारणीसाठी ना हरकत दाखल्याची सूचना नगरसेवक संदीप वर्पे यांच्या मागणीनुसार नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मांडली त्यास सर्वांनी संमती दिली आहे.तर माधव बागेच्या ईशान्नेस असलेल्या चौकात माजी नगरसेवक स्व.बाळासाहेब शिंदे यांचे नाव देणे,या शिवाय बाजार समितीच्या पश्चिमेस सुभद्रानगर येथे असलेल्या दक्षिण-उत्तर रस्त्यास माजी नगरसेवक जयराम आढाव यांचे नाव देण्याचा ठराव समंत करण्यात आलेला आहे.त्यास नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दुजोरा दिला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेची सर्वसधारण सभा नुकतीच दि.०५ ऑक्टोबर रोजी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास मोठ्या उत्साहात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.

सदर प्रसंगी सत्ताधारी भाजप,विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी,अपक्ष आदी समवेत सर्व विषय सभापती,नगरसेवक,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,बांधकाम अभियंता एस.एम.गावित,विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यावेळी या सभागृहापुढे एकूण ऐन वेळच्या विषयासह एकूण २७ विषय सभागृहासमोर होते त्यातील विषय क्रमांक २४ हा संपूर्ण कोपरगाव शहरातील नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमणे नगरपरिषद खर्चाने काढणे बाबत विचार विनिमय करणे असा होता.त्यास भाजप कोल्हे गट,राष्ट्रवादी काळे गट,अपक्ष नगरसेवक,आदी सर्वांनी सर्व संमतीने संमती दिली आहे.याच विषयावरून गेली दहा वर्ष मतांचे व मतपेटीचे राजकारण करून अनेकांनी आपली पोळी भाजून घेतली आहे.तर अनेकांनी रांगोळ्या काढून विस्थापितांना गाजरे दाखविण्याचे काम केले आहे.आता ऐनवेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बॉम्ब पडला असून अनेक अतिक्रमण करून ‘सरकारी पाहुणे’ बनलेल्या नागरिकांच्या मनात भीतीचे गोळे उठले आहे.कारण ऐन निवडणुकीत अनेक नगरसेवक त्यांचे नेते अतिक्रमण धारकांचे लाड करून शहराला विद्रुप करण्याचे काम करतात तर काही प्रस्थापित नगरसेवक अनेक टपरी धारकांना प्रोत्साहन देऊन आपले तुंबडी भरू धोरण घेऊन आपले उखळ पांढरे करतात.अनेक प्रस्थापितांनी तर ‘अशा जागा’ हप्ते गोळा करण्याचे साधन ठरवलेले आहे.या सर्वांना चांगलीच चपराक बसणार आहे.त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा उठला आहे.

वर्तमानात कोल्हे गट व वहाडणे यांचे गुळपीठ झाल्याने कोल्हे गटाला आनंदाचे उधाण आले आहे.त्यातून अनेक प्रपात घडत असून यावेळी त्यांना ऑनलाईन सभा ऐकू आली आहे.याबाबत कोणाचीही तक्रार असल्याची माहिती कानावर नाही हे विशेष ! मुख्याधिकारी शांताराम गोसावी व बांधकाम अभियंता एस.एम.गावित यांच्या काळातील हि पहिलीच सर्वसाधारण सभा होती.

दरम्यान यावेळी एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत नगर बाल संरक्षण समिती स्थापन करणे,माझी वसुंधरा योजनेअंतर्गत विविध कामे करणेसाठी तज्ज्ञ एजंसीची नेमणूक करणे,वसुली विभागातील अहवालानुसार इलेक्टरीक चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या स्थानिक नागरी संस्थांतील नागरिकांना मालमत्ता करातून सूट देणे बाबत विचार विनिमय करणे,वसुली विभागाच्या अहवालानुसार कर आकारणीसाठी गुणांक निश्चिती करणे,कोपरगाव नगरपरिषद नूतन इमारत इलेक्टरीक फिटिंग करणे,माझी वसुंधरा योजने अंतर्गत झाडे लावणे,व खड्डे करणेसाठी मशीन घेणे,झाडांना संरक्षण जाळ्या खरेदी निविदा मागविणे,आरोग्य विभागाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमे अंतर्गत शहरातील रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे,प्रभाग निहाय कार्यालये उभारणे,घंटागाडीचे मार्ग फलक लावणे,व नाला सफाई निश्चित करणे,महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान अंतर्गत नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना,विशेष रस्ता अनुदान व सर्वसाधारण रस्ता अनुदान अभियान अंतर्गत विविध विकास कामे करणे,वैशिष्ठपूर्ण कामासाठी विशेष विविध विकास कामे करणे,महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत नगरपरिषद मालकीच्या स्मशान भूमीत गॅस शवदाहिनी उभारणे,या खेरीज शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल व भाजप गटनेते रवींद्र पाठक यांनी दि.२७ सप्टेंबर रोजी ०२ विकास कामे रद्द करने बाबत दिलेल्या अर्जाचा विचार करणे,आदी सर्व विषय मंजूर करण्यात आले आहे.मात्र ते दोन कामे कोणती आहेत याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close