कोपरगाव तालुका
कोपरगावात चंद्र,तारे देणाऱ्या पासून सावधान-भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांचा इशारा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या दोन नगरसेवकांनी आम्ही,”तुमच्यासाठी दोघे मिळून १० लाख रूपये “नगरसेवक निधी” देत आहोत अशी थाप मारली आहे तसे संदेश व्हाट्स अँपवर राजरोस फिरत आहेत.मात्र आगामी नगरपरिषद निवडणुक जवळ आली म्हणून चंद्र तारे देणाऱ्या पासून जनतेने सावध होऊन हि “जनतेला मारलेली शुद्ध थाप” असल्याचे प्रतिपादन भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.त्यामुळे या ‘थापड्यांना’ उघडे पडण्याचा अनास्था प्रसंग ओढवला आहे.
“वर्तमानात राज्य परिवहन मंडळाच्या बस आगाराचे जवळ व गोदावरी नदी पात्राच्या दरम्यान एका प्रभागात मतदारांना आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या बतावण्या सुरु आहे.”चंद्र,तारे,नद्या,नाले सर्वच आणून देतो” असा काहीसा प्रकार सुरु आहे.वास्तविक शहरात आता अनेक विकासकामे वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान-ठोक तरतुद योजना अनुदान व नगरपरिषद निधी अंतर्गत निधी या निधीतून होत आहेत.खरे तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अशा कामांचे श्रेय घ्यायला हवे पण ते तसे करत नाही हे त्यांचे मोठेपण आहे”-विनायक गायकवाड,माजी शहराध्यक्ष भाजप.
कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक अवघी दीड महिन्यावर येऊन ठेपली असताना मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी नाना क्लुप्त्या शोधण्याचे काम सत्ताधारी व विरोधी नगरसेवक व त्यांचे नेते यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहे.त्याला बरीच ‘बरकत’ आली आहे.निळवंडेच्या जलवाहिणीचा सर्वोच्च पातळीवर अडकलेला आहे.हे सर्व विदित आहे.असा प्रश्न न्यायिक कचाट्यात असताना त्यावर भाष्य करत नाही याचे सामान्य माणसाला असलेले भान या मंडळींना राहिलेले दिसत नाही.नगराध्यक्ष पदाचे स्वप्न दिवसाढवळ्या काहींना पडू लागले आहे.यातून त्यांचे व त्यांच्या नेत्यांचे केवळ अज्ञान उघडे पडले असून ज्या प्रश्नामुळे आपले दरबारी पद गेले तरी याचे भान राहिले नाही.नेत्यांची पाणीचोरी,गळती,वितरण व्यवस्थेचा बोजवारा,पाणी उचलण्याच्या व साठवण क्षमतेचा अभाव,या बाबीमुळे हा प्रश्न सुटला नाही हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ असताना तेच चर्चेचे चऱ्हाट वळण्याचे काम सातत्याने सुरु आहे.’जखम मांडीला आणि जखम शेंडीला’ हा न्याय येथेही लागू करून आपल्या अकलेचे दिवाळे काढण्याचे काम यथा शक्ती हे ‘नेते’ म्हणविणारे करताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली असून यावर भाजपचे शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी ताशेरे ओढले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,कोपरगाव शहरात गत पावणे पाच वर्ष नगराध्यक्ष पदी विजय वहाडणे हे आहे.व त्यांच्या काळात भ्रष्टाचार कमी होऊन शहरातील विविध कामास गती आली आहे.अर्थातच विरोधकांनी विरोध करताना एकही संधी सोडली नाही हे विशेष ! तरीही ज्या प्रश्नाशी आपला दुरान्वये संबध नाही अशी मंडळी आपल्या दंडाच्या बेटकुळ्या फुगवून दाखवत आहे.वर्तमानात राज्य परिवहन मंडळाच्या बस आगाराचे जवळ व गोदावरी नदी पात्राच्या दरम्यान एका प्रभागात अशाच बतावण्या मतदारांना सुरु आहे.”चंद्र,तारे,नद्या,नाले सर्वच आणून देतो” असा काहीसा प्रकार सुरु आहे.वास्तविक शहरात आता अनेक विकासकामे वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान-ठोक तरतुद योजना अनुदान व नगरपरिषद निधी अंतर्गत निधी या निधीतून होत आहेत.खरे तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अशा कामांचे श्रेय घ्यायला हवे पण ते कधीही स्वतः असे श्रेय घेत असल्याचे दिसत नाही व त्याबाबत चकार शब्द काढत नाही.वास्तविक नगरपरिषदेमार्फत होणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या कामांचे श्रेय नगराध्यक्ष वहाडणे यांनी घ्यायला काहीच हरकत नव्हती.त्याउलट कोल्हे गटाचे दोन शिवसेना नगरसेवक मात्र अस्तित्वात नसलेला “नगरसेवक निधी” देऊ म्हणून आपलीच पाठ थोपटून घेताना दिसत आहे.व श्रेय घेण्याची केविलवाणी धडपड करत आहेत.याबाबत जनतेनेही आगामी निवडणूक समोर असताना असे प्रकार नवे नाही हि बाब येथे लक्षात घेणे गरजेचे आहे.काहीजण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवेदने,मागण्या,व्हाट्सअप द्वारे बातम्या याद्वारे जनतेला,”आम्हीच खरे तळमळीचे” असे भासविण्याचा प्रयत्न करत आहेत.जनतेने अशा प्रवृत्तीना वेळीच ओळखले पाहिजे.नगरपरिषदेकडून होणाऱ्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.विजय वहाडणे सध्या काही बोलत नाहीत याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये असे आवाहनही भा.ज.पा.चे माजी शहराध्यक्ष गायकवाड यांनी शेवटी केले आहे.