जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…या गावात महिलेचा एकाने केला विनयभंग,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर येथील एका महिलेचा ती गावातील सार्वजनिक सौचालयात नैसर्गिक विधीसाठी गेली असता तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याच गावातील आरोपी अनिल मच्छीन्द्र सोळसे रा.शिवाजीनगर याने केल्याने त्याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने दहिगाव बोलका परिसरात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका या गावालगत वायव्येस शिवाजीनगर हे उपनगर आहे.या ठिकाणी श्रमजीवी ग्रामस्थांची मोठी वस्ती आहे.त्याच ठिकाणी आपदग्रस्त महिला आपल्या कुटुंब कबिल्यासह रहाते. त्याच ठिकाणचा आरोपी हा या महिलेवर वाकडी नजर ठेऊन होता.त्याने हि महिला मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी सांयकाळी पाच वाजेच्या दरम्यान एकटीच सार्वजनिक सौचालयात गेली असता आरोपी अनिल सोळसे याने सौचालयाचा दरवाजा लोटून उघडून फिर्यादी महिलेचा डावा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे उघड झाले आहे.तसा आरोप आपल्या तक्रारीत फिर्यादी महिलेने केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी गु.र.नं.१६७/२०१९ भा.द.वि.कलम ३५४,३५४ (क) प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close