जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दुष्काळी शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी खोरे विभागणी केली-कुदळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे लागेल. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावे लागतील. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोर्‍यांची विभागणी केली. यावरून डॉ. बाबासाहेब यांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येत असल्याचे प्रतिपादन कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी कोळपेवाडी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकर्‍याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटीश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित असल्याचे त्यांनी तत्कालीन सरकारला बजावले होते-कुदळे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक राजेंद्र मेहेरखांब, सचिव सुनील कोल्हे,कार्यालयीन अधीक्षक बाबा सय्यद, पंचायत समिती सदस्य राहुल जगधने, सरपंच शशिकांत वाबळे, समता दलाचे सदस्य सिद्धार्थ मेहेरखांब, अरुण लोंढे, अंबादास मेहेरखांब, विजय गायकवाड, कथु यशोद, ग्रामपंचायत सदस्य बन्सी निकम, भरत मेहेरखांब, सौ.सविता लोंढे, विष्णू सोनवणे, डॉ. रावसाहेब गोरे, प्रवीण अंभिरे, दादा जगताप, बाळू साळवे, परसराम मेहेरखांब, मोहन गायकवाड, बाळासाहेब रोकडे, बाळू मेहेरखांब, रमेश निकम, देवेंद्र मोकळ, बाळू मोकळ, राहुल बनकर, किशोर बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close