जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त – काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)
आजच्या युगात विज्ञान व तंत्रज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाला असून जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जात आहेत याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन आपल्यात लपलेल्या संशोधकास जागृत करणे गरजेचे आहे त्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयात मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी शालेय स्तरावर विज्ञान, गणित व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांनी विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रत्येक उपकरणांची विद्यार्थ्याकडून माहिती घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कौतुक केले. याप्रसंगी शिवाजीराव वाबळे, बाबुराव कोल्हे, कचरू कोळपे, राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ. छाया काकडे, श्री. छत्रपती संभाजी विद्यालायचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या विज्ञान प्रदर्शनात ५ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांचे लहान व मोठा गट असे वर्गीकरण कऱण्यात आले होते.५ वी ते ७ वी १२० उपकरणे, ८ ते १२ वी ११० व तांत्रिक विभाग २० अशी एकुण २५० उपकरणे मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावी, नवनवीन कल्पकता व संशोधन वृत्ती वाढावी तसेच निरीक्षण क्षमता निर्माण व्हावी या हेतूने प्रदर्शन भरविण्यात आले असल्याचे शाळेचे प्राचार्य सुखदेव काळे यांनी सांगितले. या शालेय विज्ञान गणित प्रदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यालयाचे प्राचार्य सुखदेव काळे, उपमुख्याध्यापक मच्छिंद्र पाचोरे,पर्यवेक्षक रामकृष्ण दिघे, अमीर शेख व सर्व विज्ञान व गणित शिक्षक, सर्व शिक्षक व कर्मचारीवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close