जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

गांधी कुटुंबाच्या हुजऱ्यांचे मुजरे झाडू लागले-भाजप जिल्हाध्यक्ष यांची टीका

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे व त्यांच्या आडनावावरून पोरकट वक्तव्ये करणे महागात पडते हे आता सोनिया,राहुल गांधी व वाड्रा कुटुंबास पुरेपूर उमगल्याने आता पाळीव पोपटांच्या मुखातून असे उद्योग कॉंग्रेसने या पूर्वी केले असून ते भाजपला नवे नाही आताही तेच उद्योग त्यांनी सुरू केले काँग्रेसच्या हुजऱ्यांचे मुजरे झाडू लागले असल्याची टीका भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

“या पूर्वी गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली होती.’मौत का सौदागर’,’खून का दलाल’अशा शब्दांत सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली तेव्हा देशातील जनतेनेच कॉंग्रेसला झिडकारले.राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे तर त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागले असून अशाच बेताल वक्तव्यांमुळे त्यांना खासदारकी देखील गमवावी लागली आहे याची जाणीव ठेवावी”-राजेंद्र गोंदकर,अध्यक्ष,अ.नगर जिल्हा भाजप,

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मल्लिकार्जुन खरगेंचा संयम सुटला असल्याचे दिसून आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे आहेत.तुम्ही त्यांना विषारी समजा किंवा समजू नका.मात्र या विषामुळे तुम्ही मरुन जाल.मोदी हे काय चांगले व्यक्ती आहेत का ? तर तसं अजिबात नाही.तुम्ही त्यांना चांगलं समजत असाल आणि जवळ जाल तर अशी निद्रा निजाल की पुन्हा तुम्हाला जाग येणार नाही.मल्लिकार्जुन खरगेंनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.त्यानंतर भाजपाने त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली आहे.त्यातून जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी या टिकेला एका प्रसिद्धी पत्रकानंव्ये उत्तर दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”पंतप्रधान मोदी हे विषारी साप असल्याचे वक्तव्य करून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गांधी कुटुंबाची संस्कृती जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.याआधी गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली होती.’मौत का सौदागर’,’खून का दलाल’अशा शब्दांत सोनिया गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली तेव्हा देशातील जनतेनेच कॉंग्रेसला झिडकारले.राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे तर त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागले असून अशाच बेताल वक्तव्यांमुळे त्यांना खासदारकी देखील गमवावी लागली असल्याची आठवण गोंदकर यांनी करून दिली आहे.

त्यामुळे आता गांधी परिवाराची भाषा त्यांचे निष्ठावंत हुजरे बोलू लागले आहेत.देशाच्या पंतप्रधानांविषयी अशी बेताल वक्तव्ये करून अगोदरच धुळीस मिळालेली पक्षाची प्रतिमा रसातळाला नेत असल्याचे भान कॉंग्रेसी पोपटांना नाही,पण जनता त्यांना माफ करणार नाही असा इशारा देतानाच,या वक्तव्याबद्दल सोनिया गांधी आणि पक्षाध्यक्ष खर्गे यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीही जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close