जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात मांजाने एकाचा गळा कापला,गुन्हा नाही

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावसह राज्यभरात सध्या संक्रांत जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे पतंग व मांजाचे वेड तरुणाईच्या डोक्यात चढत चालले असून त्यातून होणाऱ्या बेपर्वाईने अपघातास होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव शहरात धारणगाव रस्त्याने आपल्या सोनारी गावाकडे आपल्या दुचाकीवरून सांयकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास जात असताना संजीवनी सहकारी कारखान्याचे कर्मचारी सुखदेव कारभारी आघाव (वय-४५) हे पतंगाच्या मांजाचे या वर्षीचे पहिले बळी ठरले असून नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या चिनी मांजास बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे.

पतंगाचा शोध प्राचीन आहे. पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेला असे उल्लेख आढळतात. बेंजामिन फ्रॅन्कलिन या शास्त्रज्ञाने ढगांमध्ये विद्युतउर्जा असतात हे पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून सिद्ध केले होते. भारतात संक्रातीला व २६ जानेवारीला पतंग उडवण्याची प्रथा
आहे.पतंगाची दोरी म्हणजेच ‘मांजा’काचेचा (वस्त्रगाळ) भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो. यामुळे तो कडक बनतो व इतर पतंग काटू शकतो. बारीक असलेला बरेली मांजा उत्कृष्ट मानला जातो. आणि पतंग हा मकर संक्रातिला पण काही जण उडवतात हेच पतंग रस्त्यालगत उडविल्यास अपघातास कारणीभूत ठरत असतात.

विशेषतः नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.तसा अन्यत्रही तो साजरा केला जातो त्याला कोपरगाव शहर अपवाद नाही.अद्याप पतंग महोत्सव दूर असला तरी काही उत्साही तरुणांनी आपल्या पतंगबाजीस वेळेआधीच प्रारंभ केल्याचे जागोजागी दिसून येत आहे.त्यातच प्रत्येक वस्तूवर अतिक्रमण करणाऱ्या चिनी व्यापाऱ्यांनी या बाबतीतही बाजारपेठ काबीज केली असून या मांजाने अनेक अपघात होत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.विशेषतः कोपरगाव तालुक्यात तर दरवर्षी हमखास एखादं-दोन अपघात ठरलेलेच आहे.त्यातून अनेकांना आपले जीवही गमवावे लागला आहे.वित्तीय हानी वेगळीच.असाच अनुभव आज सांयकाळी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी सुखदेव आघाव हे आपले कर्तव्य संपवून घरी जात असताना धारणगाव रस्त्यावर मुर्शतपुर नजीक त्यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा आडवा आला व त्याने त्यांचा गळाच कापून गंभीर दुखापत झालीय आहे.हि दुर्घटना झाल्यावर नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना कोपरगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे.या अपघातात ते दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने बचावला आहेत.
दरम्यान या घटनेबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.मात्र या रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्या या पतंगबाज तरुणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वकील संदीप सांगळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close