जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पत्र्याचे शेडमधून ५.७० लाखांची चोरी,कोपरगाव तालुक्यात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी माधव भालचंद्र देव (वय-५६) यांच्या गट क्रं.२३० मधील बंद शेड मधून अज्ञात चोरट्याने विविध दागिने आणि रोख रक्कम बुधवारी रात्री ११ वाजे नंतर अज्ञात चोरट्याने ७५ हजारांची रोख रक्कम विविध सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे ०५ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याने ब्राम्हणगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील घटनेनंतर पुन्हा एकदा आपले लक्ष पुन्हा एकदा घरफोडी कडे वळवले असल्याचे दिसून आले असून नुकतेच बुधवार दि.२६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजे नंतर कधीतरी अज्ञात चोरट्यांनी ब्राम्हणगाव येथील फिर्यादी माधव भालचंद्र देव यांच्या पत्र्याचे बंद शेड मध्ये पाळत ठेवून त्यातील मोठा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचे सत्र सुरु झाले असून आता चारचाकी,दुचाकी चोरी नंतर चोरट्यांनी संवत्सर येथील घटनेनंतर पुन्हा एकदा आपले लक्ष पुन्हा एकदा घरफोडी कडे वळवले असल्याचे दिसून आले असून नुकतेच बुधवार दि.२६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजे नंतर कधीतरी अज्ञात चोरट्यांनी ब्राम्हणगाव येथील फिर्यादी माधव भालचंद्र देव यांच्या पत्र्याचे बंद शेड मध्ये पाळत ठेवून त्यातील मोठा ऐवज लंपास केला आहे.

त्यात ७५ हजार रुपये किंमतीची रोख रक्कम यात ५०० रुपये दराच्या नोटा,९० हजार रूपये किमतीचे साडेचार तोळे सोने,६० हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस,२० हजार किमतीचे एक तोळा सोन्याची गळ्यातील चैन,२० हजार किमतीची एक तोळा वजनाचे देवीचे गळ्यातील गंठण,२० हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे दोन सोन्याच्या पिवळ्या अंगठ्या,१ लाख ८० हजार रुपये किमतीचे नऊ किलोचे चांदीचे दागिने,त्यात चार ताटे,दोन लोट्या,दोन फुल पात्रे,दोन वाट्या,दोन पळ्या,एक अभिषेक पात्र,तीन ग्लास,सर्व वस्तू जुण्या वापरत्या आहेत,एक ०५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हँडसेट,त्यात एअर तेल कंपनीचे सिम कार्ड त्याचा क्रं.७६६६८०८१६३ असा एकूण ०५ लाख ७० हजार रुपयांचा अवैज चोरट्यांनी लंपास केला आहे.त्यामुळे ब्राम्हणगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२२७/२०२३ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुसारे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close