कोपरगाव तालुक्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने मंजूर केलेली रक्कम अत्यंत तोकडी असून राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोपरगाव तालुका बळीराजा पार्टीच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे.
या प्रसंगी बळीराजा पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कवडे,तालुका प्रमुख अमोल आचारी, तालुका उपप्रमुख योगेश (विशाल )मेहेञे,केतन खरोटे, किरण महाजन महेश डमाळे, शहर प्रमुख अबुबकर हाजी हबिबभाई मणियार, सचिव योगेश आढाव,कार्यकर्त अमित खोकले, अझरुद्दीन मणियार आदी मान्यवर उपस्थित होते .