कोपरगाव तालुका
रस्त्याच्या कामावरून पालिका सर्वसाधारण सभेत “तू-तू-मैं-मैं”…
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या आज सकाळी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत लक्ष्मीनगर व डॉ.आचारी हॉस्पिटल रस्ता या उपनगरातील रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट केल्याने त्याच्याविरुध्द मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री कोल्हे गटाचे पालिका गटनेते रवींद्र पाठक, अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद आदींनी केली आहे.त्यावरून सत्ताधारी गटाला अनेक नगरसेवकांनी फैलावर घेतले आहे.त्यामुळे आज आयोजित सर्वसाधारण सभा रस्त्याच्या प्रश्नाभोवतीच केंद्रित झाल्याचे दिसून आले आहे.
त्यावेळी चर्चेत संदीप वर्पे,शिवाजी खांडेकर,भारती वायखिंडे,संजय पवार,कैलास जाधव,माधवी वाकचौरे आदींनी सहभाग नोंदवला आहे.यावेळी सभेच्या समोर विषय पटलावर सोळा विषय ठेवण्यात आले होते.त्यात विषय क्रमांक आठ ते दहा मधील स.नं.181/2/100,193/1 आ. क्र.75,स.नं.85 (अ) आदींचे आरक्षण रद्द करण्यावरून नगरसेवक संदीप वर्पे यांनी जोरदार हरकत घेतली आपण हा विषय मंजूर केल्यास आपण मुख्यमंत्री,नगरविकास मंत्र्यांपर्यंत संघर्ष करू असा इशारा नगरपालिका प्रशासनास दिला आहे.त्यामुळे प्रशासनाची गोची झाल्याचे दिसून आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव नगरपरिषदेने आज सकाळी अकरा वाजता पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.त्यावेळी विषय पत्रिकेत विषय क्रमांक पाच हा चौदावा वित्त आयोग अंतर्गत व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधीतून विविध विकास कामे करणे बाबतचा होता.त्यावेळी हा विषय गटनेते रवींद्र पथक यांनी उपस्थित केला होता.त्याला अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद ,स्वप्नील निखाडे यांनी उचलून धरले.सदर प्रसंगी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, राष्ट्रवादीचे नगरसेवक विरेन बोरावके,राष्ट्रवादीचे नेते संदीप वर्पे,नगरसेविका ऐश्वर्या सातभाई,विद्या सोनवणे,भरती वायखिंडे,कैलास जाधव, मंदार पहाडे, अनिल आव्हाड, विजय वाजे,सुवर्णा सोनवणे,जनार्दन कदम,सेनेच्या नगरसेविका सपना मोरे,प्रतिभा शिलेदार,आदींसह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान बैल बाजार रस्त्याचे काम सध्या सुरू असून या जुन्या रस्त्यावरील डांबर काढून ते पुन्हा त्याच कामात कसे वापरले जाते व तशी परवानगी आहे का? असा जाबसाल नगरसेवक सत्येंन मुंदडा नगरसेवक आरिफ कुरेशी यांनी विचारला आहे.बैलबाजार रस्त्याच्या कामात जुनेच गौणखनिज व कालबाह्य डांबर वापरत असल्या बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.व ते त्यास काढून घेण्यास सांगितले आहे.
त्यावेळी लक्ष्मीनगर मधील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने त्या रस्त्यावरील सिमेंटची धूळीने येथील नागरिकांना जगणे नकोसे केले आहे.त्यापेक्षा,” हा रस्ता नको” असे म्हणण्याचा या नागरिकांवर अनास्था प्रसंग ओढवला आहे.त्यामुळे त्या ठेकेदारावर कारवाई करावी.झोपडपट्टी भागातील रस्त्याची कामे कधी करणार ? नवीन योजनेत त्याभागातील रस्ते का घेतले नाही असा सवाल पाठक यांनी विचारत तुमच्या ताब्यात सत्ता येऊन तीन वर्षाचा काळ झाला आहे कामे का झाली नाही ? आम्ही काय सह्याच करायच्या का ? असा सवाल अध्यक्ष वहाडणे याना विचारला आहे.निकृष्ठ कामामुळे अध्यक्ष वहाडणे यांचीच बदनामी होत असल्याचा दावा केला.व श्रीमान गोकुलचंद विद्यालयाचा रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप केला आहे.व तो चांगला करावा अशी मागणी केली आहे.त्यावेळी स्वप्नील निखाडे यांनी डॉ.आचारी हॉस्पिटल रस्त्याची तीच गत असून या ठेकेदारावर काय कारवाई करणार असा सवाल विचारला आहे.ठेकेदाराने त्या रस्त्याचे बिल कसे काढून घेतले ? एका महिन्यात त्यावर कारवाई करावी.दरम्यान बैल बाजार रस्त्याचे काम सध्या सुरू असून या जुन्या रस्त्यावरील डांबर काढून ते पुन्हा त्याच कामात कसे वापरले जाते व तशी परवानगी आहे का? असा जाबसाल नगरसेवक सत्येंन मुंदडा नगरसेवक आरिफ कुरेशी यांनी विचारला आहे.बैलबाजार रस्त्याच्या कामात जुनेच गौणखनिज व कालबाह्य डांबर वापरत असल्या बाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.व ते त्यास काढून घेण्यास सांगितले आहे.त्यावेळी नगर अभियंता बी.एस. वाघ यांनी बैल बाजार रस्त्याची चूक मान्य केली व पाठक यांच्या प्रभागातील दोन नव्या रस्त्यांचे काम घेतल्याचे सांगून त्याना शांत करण्याचा प्रयत्न केला.
पालिका कार्यक्षेत्रात ठेकेदार बोगस कामे करूनही त्यांना कामे कशी काय दिली जातात.मजूर संस्था एकाच्या नावावर व काम भलताच कसा काय करतो ? काम निकृष्ट करणाऱ्यांना काळ्या यादीत का टाकत नाहीत ? दुसऱ्यांच्या मजूर संस्थांवर कामे घेऊन नगरपालिकेच्या निधीचा अपव्यय थांबवणार कधी गत सहा-सात महिन्यात अंबिका स्टॉल समोरील केलेला रस्ता लगेच फुटला कसा असा नेमका सवाल केला.कन्या शाळेच्या समोरून गटार वाहते.त्यामुळे डेंगू व रोगराई पसरत आहे ते काम तीन वर्षांपासून चालू असून ते का पूर्ण होत नाही असा सवाल केला आहे.निकृष्ट काम करणाऱ्या सर्वच ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे-अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद
त्या वेळी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी ठेकेदार बोगस कामे करूनही त्यांना कामे कशी काय दिली जातात.मजूर संस्था एकाच्या नावावर व काम भलताच कसा काय करतो ? काम निकृष्ट करणाऱ्यांना काळ्या यादीत का टाकत नाहीत ? दुसऱ्यांच्या मजूर संस्थांवर कामे घेऊन नगरपालिकेच्या निधीचा अपव्यय थांबवणार कधी गत सहा-सात महिन्यात अंबिका स्टॉल समोरील केलेला रस्ता लगेच फुटला कसा असा नेमका सवाल केला.कन्या शाळेच्या समोरून गटार वाहते.त्यामुळे डेंगू व रोगराई पसरत आहे ते काम तीन वर्षांपासून चालू असून ते का पूर्ण होत नाही असा सवाल केला आहे.निकृष्ट काम करणाऱ्या सर्वच ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केल्यावर आरोग्य सभापती अनिल आव्हाड यांनी त्यास हरकत घेतली आमचे रस्ते खराब का होत नाही ? तुमच्याच प्रभागातील रस्ते खराब का होतात असा सवाल केला व आम्ही स्वतः उभे राहून कामे करून घेतो तुम्ही तसे का करीत नाही.असे म्हणून आमच्या प्रभागातील ठेकेदारावर कारवाई व सर्व कामे बंद करण्यास जोरदार हरकत घेतली.त्यावेळी या दोघातच जुंपल्याचे चित्र सभागृहात निर्माण झाले होते.त्यावेळी जनार्धन कदम यांनी सदरच्या रस्त्यांची कामे जुन्या अंदाजपत्रकानुसार असल्याने ठेकेदार काम करीत नसल्याचे समर्थन केले.त्यावेळी हि चर्चा थांबवत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी ठेकेदारावर कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली व ठेकेदार निविदा भरण्यास धजावत नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली.व अनेक निधी परत गेल्याचे सांगितले.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी राज्याचे नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कोपरगावचे नवोदित आ.आशुतोष काळे यांच्या अभिनंदनाचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करावा अशी मागणी एक निवेदन देऊन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेकडे सभेचे कामकाज सुरु करण्यापूर्वी केली होती तर ऐंनवेळच्या विषयात उपाध्यक्ष योगेश बागुल यांनी या दोन्ही नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्यास टाळ्यांच्या गजरात सर्वांनी साथ देऊन ठराव मंजूर केला.
त्यावेळी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी ज्यांनी मुदतीत कामे केली नाही त्यांचे ठेके रद्द करण्याची सूचना केली.व त्याना परत कामे देऊ नका त्यांची अनामत रक्कम जप्त करा असे आदेश फर्मावले.रवींद्र पाठक यांनी त्यास हरकत घेतली व ज्यांची तक्रार असेल त्यांच्यावरच कारवाई करा अशी मागणी लावून धरली.त्यावेळी अध्यक्ष वहाडणे यांनी ठेकेदांराचा विषय संपविण्यासाठी ज्या प्रभागात तक्रार असेल तेथील नगरसेवक व नागरिक,ठेकेदार,अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश देऊन तो विषय नगरसेवकांच्या गळ्यात मारला.त्यावेळी नगरसेविका विद्या सोनवणे यांनी कोर्ट रस्त्याचा निधी परत गेल्याची तक्रार केली असता तो निधी परत गेला असल्याबाबत सहमती माहिती मुख्याधिकारी सरोदे यांनी दर्शवली.व तो आपण येथे रुजू होण्याआधी गेला असल्याच्या बाबीकडे सोनवणे यांचे लक्ष वेधले.व तो प्रश्न त्यांच्याच गळ्यात मारला.नगरसेविका सपना मोरे यांनी बाजारतळावरील बांधलेले ओट्यांचे उदघाटन कधी करणार या कडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले व तेथे वेगवेगळे धंदे चालतात असल्याचा आरोप केला व ते काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली.मुख्याधिकारी सरोदे यांनी त्यावेळी त्यावर प्राधान्यक्रम ठरविण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले आहे.