कोपरगाव तालुका
संवत्सर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी केशवराव भाकरे पा यांची एकमताने निवड
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर ( प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या गणल्या गेलेल्या संवत्सर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी केशवराव भाकरे पा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
कोपरगाव तालुक्यातील मोठ्या गणल्या जाणाऱ्या संवत्सर ग्रामपंचायतचे उपसरपंच विवेक परजणे यांनी राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झाली होती.त्या जागेवर हि निवड झाली आहे. या वेळी जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य शांताराम परजणे यांनी केशवराव आनंदराव भाकरे पा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला व त्यास मावळते उप सरपंच विवेक परजणे व सरपंच मेहेत्रे यांनी अनुमोदन दिले.
केशवराव भाकरे यांच्या निवडीच्या वेळी नामदेवराव परजणे पाटील गोदावरी दुध संघांचे अध्यक्ष तथा जि प सदस्य राजेश परजणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शुभेच्छा दिल्या. या वेळी राजेश परजणे या प्रसंगी मार्गदर्शन केले व ग्रामपंचायत तसेच जि. प, पं. स. निधी मंजूर करून गावच्या झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला गावच्या लोकांसाठी निरनिराळ्या योजना व सुविधा सेवांचा आढावा घेतला पंचायत समिती सदस्य कृष्णा परजणे, सरपंच सौ मेहेत्रे. उ. स. श्री लोखंडे लक्ष्मणराव साबळे,लक्ष्मणराव परजणे, पत्रकार शिवाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व जेष्ठ मार्गदर्शक, कार्यकर्ते, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यांनी व उपस्थित ग्रामस्थांनी श्री भाकरे यांची निवड झाल्या बद्दल आनंद व्यक्त केला, अभिनंदन केले आहे.
या निवडीनंतर श्री भाकरे पा. यांनी स्व.नामदेवराव परजणे यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व आदर्शांनुसार काम करणार असुन आपली निवड सार्थ ठरवणार असल्याचे म्हटले आहे.