जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी १ कोटी ६३ लाख निधी मंजूर -सभापती अनुसया होन

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )
जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केल्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांसाठी १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे वाहनाचे वित्तीय नुकसान हि वेगळीच बाब असून अजूनही नवनिर्वाचित आ. आशुतोष काळे यांनी रस्त्यांसाठी निधी आणणे गरजेचे आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे या कडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे.


प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरावस्था सुधारणेसाठीनजास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी कोपरगाव पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये रस्त्यांसाठी मिळालेला निधी पुढीलप्रमाणे असून मौजे येसगाव, टाकळी, सोनारी, रवंदे ते जिल्हा हद्द १८ लाख, राज्य मार्ग ३६ कारवाडी ते तालुका हद्द रस्ता १८ लाख, अंचलगाव ते करंजी १८ लाख, ओगदी, पढेगाव ते संवत्सर १८ लाख, देर्डे चांदवड ते शिलेदार वस्ती १८ लाख, संवत्सर, दशरथवाडी ते दहिगाव बोलका १५ लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ते मनाई वस्ती १५ लाख,तसेच रस्ते दुरुस्तीसाठी मौजे संवत्सर परजणे वस्ती ते वैजापूर रस्ता ६ लाख, रवंदे ते महालखेडा ५ लाख, नगर मनमाड राज्य मार्ग ते खैरोबा मंदिर शिवरस्ता ३ लाख, कोकमठाण श्री.लक्ष्मीमाता मंदिर ते बाळासाहेब राऊत यांचे घरापर्यंत ३ लाख, देर्डे कोऱ्हाळे ते घारी ३ लाख, मौजे संवत्सर बिरोबा चौक ते निकम वस्ती २० लाख व वेळापूर शिवरस्ता दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये असा एकून १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करत मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. या पाठपुराव्याला आ.आशुतोष काळे यांचे पाठबळ मिळत असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात यापेक्षाही जास्त निधी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने चेहरा मोहरा उजाळला जाणार असल्याचे सभापतीअनुसया होन यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close