जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संवत्सर येथील कांदा मार्केट लवकरच लोकप्रिय करू-परजणे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील कांदा मार्केट तालुक्यातील शेतकऱ्यांत लवकरच लोकप्रिय करू असे आश्वासन संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

“नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत,विंचुर,लासलगाव आदी कांदा मार्केट यशस्वी का झाले याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे.या मार्केट मुळे येथील तरुणांना रोजगार मिळणार आहे.स्थानिक शेतकऱ्यांचे भाडे,श्रम व वेळ वाचण्यात मदत मिळणार आहे.याशिवाय आगामी काळाचा वेध घेऊन त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन हे मार्केट लवकरच नावारूपाला आणू”-विवेक परजणे,उपसरपंच संवत्सर ग्रामपंचायत.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे नुकतेच मुंबई-नागपूर महामार्गालगत लक्ष्मीआई मंदिरालगत कांदा मार्केट सुरु करण्यात आले आहे.त्याचे उदघाटन गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरू जंगली महाराज आश्रमाचे संत गुरुदेव माउली यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं संवत्सर येथील चक्रधर स्वामी आश्रमाचे महंत राजधरबाबा हे होते.

सदर प्रसंगी गोदावरी-परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,तालुका बाजार समितीचे संचालक भरत बोरणारे,खंडू फेफाळे,लक्ष्मण साबळे,व्यापारी प्रतिनिधी मधुकर साबळे,श्री वक्ते,पंचायत समिती,सहाय्यक निबंधक कार्यालय,आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.त्या वेळी श्रीरामपूर,वैजापूर,कोपरगाव येथील व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे.व अशोक टुपॅके या शेतकऱ्याला सर्वाधिक दोन हजार रुपये क्विंटलचा भाव देण्यात आला आहे.त्याचा शेतकऱ्यांनी पेढे वाटून स्वागत केले आहे.

सदर प्रसंगी सरपंच सुलोचना ढेपले यांच्या हस्ते नूतन कांदा वाहनाचे विधिवत पूजन करण्यात आले आहे.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत,विंचुर,लासलगाव आदी कांदा मार्केट यशस्वी का झाले याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे.या मार्केट मुळे येथील तरुणांना रोजगार मिळणार आहे.स्थानिक शेतकऱ्यांचे भाडे,श्रम व वेळ वाचण्यात मदत मिळणार आहे.याशिवाय आगामी काळाचा वेध घेऊन त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन हे मार्केट लवकरच नावारूपाला आणले जाईल असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.

सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेश परजणे यांनी केले तर उपस्थितांना राजधर बाबा,स्थनिक शेतकरी यांनी मनोगत व्यक्त केले आहे.त्यावेळी राजधर बाबा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.उपस्थितांचे आभार मधुकर साबळे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close