जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साध्या पद्धतीने संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आयोजित केलेला श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात आला असून उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार सर्व कार्यक्रम पार पडले आहेत.

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या औचित्‍यावर मंदिर पुजारी दिलीप सुलाखे यांनी त्‍यांच्‍या पत्‍नी मंजु सुलाखे यांचे नावे असलेली मौजे रुई, तालुका राहाता गट नंबर ४४३/३ येथील ०१ एकर (४० आर क्षेत्र) सुमारे ८७ लाख रुपये किंमतीची शेतजमीन श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिली आहे.त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाली. पहाटे ०५.०० वाजता श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली.या निमित्ताने श्री साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची व्दारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीत जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती,अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा यांनी पोथी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी विणा तर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मालती सुधाकर यार्लगड्डा,संगिता बगाटे,मंदिर प्रमुख रमेश चौधरी,सरंक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी व मंदिर पुजारी उपस्थित होते.

सकाळी ०५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी ०६.०० वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्थानचे तदर्थ समिती,अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा व त्‍यांची धर्मपत्‍नी मालती सुधाकर यार्लगड्डा यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा व लेंडीबागेतील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन करण्‍यात आले. त्‍यानंतर श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाचा ध्वज बदलण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप,मंदिर प्रमुख रमेश चौधरी,सरंक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी व मंदिर पुजारी उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०४.०० ते सायं. ०६.०० यावेळेत मंदिर पुजारी उल्‍हास वाळुंजकर यांचे कीर्तन सादरीकरण झाले.

श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या औचित्‍यावर मंदिर पुजारी दिलीप सुलाखे यांनी त्‍यांच्‍या पत्‍नी मंजु सुलाखे यांचे नावे असलेली मौजे रुई, तालुका राहाता गट नंबर ४४३/३ येथील ०१ एकर (४० आर क्षेत्र) सुमारे ८७ लाख रुपये किंमतीची शेतजमीन श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिली आहे.

तसेच देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना महामारीचे संकट लवकरात लवकर टळो व सर्वांना चांगले आरोग्‍य लाभो अशी प्रार्थना जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा संस्‍थानचे तदर्थ समिती,अध्‍यक्ष सुधाकर वेंकटेश्‍वरराव यार्लगड्डा यांनी सर्व साईभक्‍तांच्‍या वतीने श्री साईबाबांच्‍या चरणी केली.

उद्या उत्सवाच्या सांगता दिनी शनिवार दिनांक २४ जुलै रोजी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती होईल.सकाळी ०५.०० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.३० वाजता श्रींची पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.०० वाजता गोपालकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल.रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती संपन्न होणार आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close