जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

‘त्या’अधिकाऱ्यास मारहाण,कोपरगाव नगराध्यक्ष यांची दिलगिरी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव प्रतिनिधी- काल दि. २२ जुलै रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात येऊन बांधकाम विभागात तोडफोड करण्यात येऊन उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना मारहाण करण्याचा भ्याड प्रकार घडला असून प्रभारी मुख्याधिकारी श्री.डोईफोडे यांच्या आदेशावरून सदरचे अतिक्रमण हटविले गेले असताना उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी अनेक वर्षे लष्करात सेवा बजावून आपले संरक्षण केले त्यांच्यावर हल्ला होणे हे कोपरगाव शहरासाठी खाली मान घालायला लावणारे आहे.त्याबद्दल आपण शहराच्यावतीने दिलगिरी व्यक्त करत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

“या दुर्दैवी घटनेतील आरोपींना हे प्रकरण अंगलट यायला लागल्यावर “छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे” यांच्या प्रतिमांची विटंबना झाल्याचे कुभांड रचण्यात आले आहे.त्या दिवशी केलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईचे संपुर्ण चलचित्रफीत उपलब्ध आहे.आरोपींच्या हातून चुक घडल्यानंतर महापुरुषांच्या आड ते कशाला लपले ?-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगर परिषदेत काल दि.२२ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील पूनम चित्रपट गृहासमोरील आरोपींचे अवैध टपरीचे अतिक्रमण रात्रीच्या सुमारास नगरपरिषदेने काढल्याचा राग मनांत धरून शिवनेनेचे माजी शहराध्यक्ष सनी वाघ,माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक योगेश बागुल,उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,बालाजी गोर्डे,साई गोर्डे,निलेश गोर्डे,आशिष शेळके आदीनीं बेकायदा जमाव करून कोपरगाव नगरपरिषदेत जाऊन अधिकाऱ्यांना मारहाण,शिवीगाळ करून कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केल्या प्रकरणी आज सकाळी कोपरगाव नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी कामबंद आंदोलनाची हाक दिली असतानाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रतिक्रियेत पुढे म्हटले आहे की,”या दुर्दैवी घटनेतील आरोपींना हे प्रकरण अंगलट यायला लागल्यावर “छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे” यांच्या प्रतिमांची विटंबना झाल्याचे कुभांड रचण्यात आले आहे.त्या दिवशी केलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईचे संपुर्ण चलचित्रफीत उपलब्ध आहे.आपल्या हातून एखादी चुक घडल्यानंतर महापुरुषांच्या आड लपायचे कशाला ? खरे तर असे करून संबंधितांनीच महापुरुषांची विटंबना केली आहे असे वाटते.घटनेशी संबंधित सर्वजण असे काही करतील हे खरेच वाटत नाही.त्यांनी कशामुळे असा प्रकार केला हेही समजत नाही.ते सर्वजण माझे परिचित असून संपर्कातही असतात असे प्रकार घडले तर कोपरगाव शहरात कोणताही अधिकारी यायला धजावणार नाही. त्यामुळे विकासकामे थांबून शहराचेच नुकसान होणार आहे.याचे भान या मंडळींनी ठेवले पाहिजे.आपण सार्वजनिक जीवनात असंख्यवेळा सार्वजनिक हितासाठी आंदोलने केलेली आहेत पण महापुरुषांचा आधार कधीच घेतला नाही.काहीनीं या घटनेची खातरजमा न करताच खरेच विटंबना झाली कि नाही याची शहानिशा न करता समाजमाध्यमांवर अकलेचे तारे पाजळले आहेत.त्यांनीही जरा डोके ठिकाणावर ठेवावे असे आवाहन करून त्यांनी या घटनेच्या निमित्ताने काही भंपक पाकिटवाले,विस्थापितांना डीवचून देण्यासाठी आपल्या विरुद्ध संदेश पाठवून असंबद्ध बरळू लागले आहेत.विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न केले हे सविस्तरपणे थोड्याच दिवसांतच मांडणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close