जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राहाता तालुक्यातील ‘त्या’ गावांनाही विकास कामात न्याय-..यांचे आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जो न्याय कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला जाईल तोच न्याय राहाता तालुक्यातील मात्र कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या गावांना देणार असून हि अकरा गावे देखील विकासासाठी आपल्या अजेंड्यावर असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील नपावाडी येथे एका कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले आहे.

“आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत निवडून देण्यात कोपरगाव तालुक्यातील इतर गावांप्रमाणे राहाता तालुक्यातील अकरा गावांचा देखील वाटा आहे. त्यामुळे मतदार संघाच्या विकाससाठी निधी मिळवितांना या अकरा गावांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्या निधीतून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना चालना मिळणार आहे”-आ.आशुतोष काळे.

कोपरगाव मतदारसंघातील न.पा.वाडी येथील दादासाहेब उगले घर ते तुकाराम वहाडणे घर रस्ता मजबुतीकरण व डांबरी करण करणे,दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बंदिस्त गटार बांधणे,जलशुद्धीकरण प्रकल्प व गावअंतर्गत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवणे आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,रामभाऊ जाधव,सरपंच ज्ञानदेव साळुंके,उपसरपंच दत्तात्रय जाधव,एलमवाडीचे सरपंच शिवाजी साबदे,उपसरपंच कल्पना चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यशवंत चौधरी,गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब चौधरी,माजी सरपंच अशोक धनवटे,राजेंद्र धनवटे,रामकृष्ण वहाडणे, दिलीप चौधरी, गोपीनाथ चौधरी, राहाता शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष नंदु सदाफळ,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा सरचिटणीस रजनीकांत बोठे,प्रकाश साबदे,अमोल थोरमोठे आदी उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत निवडून देण्यात कोपरगाव तालुक्यातील इतर गावांप्रमाणे राहाता तालुक्यातील अकरा गावांचा देखील वाटा आहे. त्यामुळे मतदार संघाच्या विकाससाठी निधी मिळवितांना या अकरा गावांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्या निधीतून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना चालना मिळून नागरिकांच्या अडचणी कमी होणार आहे. तरीदेखील यावरच न थांबता या अकरा गावांसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी माझा पाठपुरावा यापुढे देखील सुरूच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close