जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पंचायत समितीत “आमचा गाव,आमचा विकास”कार्यक्रमाचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव पंचायत समितीत आज सकाळी “आमचा गाव आमचा विकास”या योजनेअंतर्गत पंचायत समितीचे सदस्य व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.ग्रामीण भागाच्या विकासाबरोबर ग्रामपंचायती अधिक सक्षम बनविणारी ‘आमचा गाव आमचा विकास’ हा उपक्रम सर्वांच्या सक्रिय सहकार्यातून निश्चित यशस्वी होईल. त्याचबरोबर शासन देत असणारा निधी, ग्रामपंचायतीचा स्व: निधी यातून गावात मुलभूत सेवा सुविधा उपलब्ध होतील, लाभार्थी समाधानी होवून गावाचे रुप पालटण्यास मोलाची मदत होईल-गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने ‘आमचा गाव-आमचा विकास’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे.महाराष्ट्राने पंचायत राज संस्थेची मुहूर्तमेढ रोवल्याने राज्याला गौरवशाली परंपरा आहे. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे देशातील एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. या त्रिस्तरीय रचनेमध्ये जिल्हा पातळीवर धोरणात्मक निर्णय, तालुका स्तरावर पर्यवेक्षकीय कामकाज व ग्रामस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. चौदाव्या वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी प्राप्त होणार आहे. या सर्वांचा विचार केल्यास सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडे तयार केले तर मिळणाऱ्या निधीतून गावांचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.

ग्रामपंचायतींना त्यांच्या स्व:उत्पन्नाच्या बाबीशिवाय चौदाव्या वित्त आयोगांतर्गत मोठ्या प्रमाणावर अबंधित प्राप्त होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत निधीच्या नियोजनाचे अधिकार ग्रामसभेला आहेत. त्यामुळे ग्रामस्तरावर लोकसहभागातून गावांच्या गरजा, उपलब्ध साधनसामग्री निकड व प्राधान्यक्रम ठरवून हे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे योग्य नियोजन करुन परिपूर्ण आराखडे तयार होणे आवश्यक असल्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी उपस्थितांना जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे व सभापती अनुसया होन आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, प्रशिक्षणाधिकारी श्री चौधरी हे म्हणाले कि, असे कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य व संगणकाचे टंकलेखक आदींसाठी आगामी काळात गणनिहाय आयोजित करण्यात आयेणार असल्याचे शेवटी सांगितले आहे.

यावेळी सभापती अनुसया होन राजेश परजणे उपसभापती अनिल कदम, पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे, श्रावण आसने आदी प्रमुख मान्यवरांसह सर्व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी दिलिप सोनकुसळे यांनी केले तर सुत्रसंचलन विस्तार अधिकारी दत्तात्रय रानमळ यांनी केले.उपस्थितांचे आभार ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनील माळी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close