कोपरगाव तालुका
वादग्रस्त प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख कार्यमुक्त,काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष होण्याची चिन्हे!
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव पंचायत समितीच्या वादग्रत तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्याबाबत शिक्षक संघटनाकडून अनेक तकारी आल्यानंतर कोपरगाव पंचायत समितीला उशिराने जाग आली असून विधानसभा निवडणूक संपन्न झाल्यावर त्यांना तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने पंचायत समितीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या मासिक सभेत शेख यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याने आगामी काळात काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व आ. आशुतोष काळे गटात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी विद्यमान आ. आशुतोष काळे यांच्या विरुद्ध बंद पुकारले होते.त्यामुळे त्यांच्यात दरी निर्माण झाली होती.कोपरगाव पंचायत समितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांत आगामी काळात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.कोपरगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीचे दहा पैकी आठ सदस्य तर शिवसेना व भाजपचा प्रत्येकी एक सदस्य आहे तर पाच जिल्हा परिषद सदस्यांपैकी चार राष्ट्रवादीचे तर एक काँग्रेसचे चार सदस्य आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे सात सदस्य निवडणून आल्याने सत्ताधारी विखे गट हादरला आहे.त्यामुळे आगामी कालखंडात राजकीय कुरघोड्यांना ऊत येण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे कोपरगाव तालुक्यातील शिक्षकांनी बंड पुकारले होते. या बाबत त्यांनी अनेक वेळा निवेदने देऊनही त्यांना गत पंधरा वर्षांपासून राजकीय अभय मिळत असल्याचा आरोप होत होता.तालुक्यातील कोळगाव थडी येथे अनधिकृत शाळा सुरु करून दुसऱ्या शाळेतील शिक्षकाची नेमणूक केली.काही दिवसातच हि शाळा बंद पडल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याच्या पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. शिक्षकांचे विनाकारण वेतन कपात करणे. बदलीपात्र शिक्षकांचे नाव यादीत नसतांना बदलीपात्र यादीत समाविष्ट करून सोयीची बदली करणे. एका शिक्षकाचा पगार जाणीवपूर्वक दुसऱ्या शिक्षकाच्या खात्यावर जमा करणे. उच्च शिक्षणाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात वेळेत न पाठविणे. शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव न पाठवता शिक्षकांची आर्थिक कुंचबना करणे. अर्जित रजा पगार कपात करणे.शिक्षकांना रजा नाकारणे शिक्षकांना शाळेच्या व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावणे. त्यांना तासन तास सायंकाळी उशिरापर्यंत पंचायत समितीच्या कार्यालयात थांबवून ठेवणे. त्यामुळे दूरच्या महिला शिक्षकांना घरी जाण्यासाठी वाहन मिळत नव्हते अशा अनेक तक्रारी सभागृहाकडे आलेल्या होत्या.
जिल्हा परिषद प्रशासनाने शबाना शेख यांची तातडीने कोपरगाव तालुक्याच्या बाहेर बदली करावी अन्यथा पंचायत समिती सभागृहाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेपुढे उपोषण करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गटनेते अर्जुन काळे यांनी इशारा दिल्याने आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
शबाना शेख यांच्यामुळे टाकळी सह दोन शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने तर मागील काही महिन्यापूर्वी शाळेतच गळफास लावून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या मुख्याध्यापकाचे प्राण जरी वाचले तरी प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर शिक्षकांनी तीव्र असंतोष व्यक्त करून आंदोलन केली होती. त्यावेळी या मुख्याध्यापकाच्या व प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या चौकशीसाठी दोन स्वतंत्र चौकशी समित्या नेमण्यात आल्या होत्या. या समितीने चौकशी पूर्ण करून शबाना शेख यांच्या त्रासाला कंटाळून ज्या शिक्षकांनी आत्महत्येचा केलेला प्रयत्न पाहता शबाना शेख यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते मात्र आत्महत्येच्या कारणावरून टाकळीच्या मुख्याध्यापकांनाच निलंबित करण्यात आल्याचा प्रताप करण्यात आला होता.तरी त्यांना काँग्रेस पुढाऱ्याकडून अभय मिळत असल्याचे दुर्दैवी चित्र पुढे आले होते.शबाना शेख यांची अद्यापही कोणतीही चौकशी न करता या प्रकरणातून शबाना शेख यांना वाचविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत होता. दरम्यान नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी विद्यमान आ. आशुतोष काळे यांच्या अपक्ष नामनिर्देशनपत्र भरून विरुद्ध बंड पुकारले होते.त्यामुळे त्यांच्यात दरी निर्माण झाली होती.कोपरगाव पंचायत समितीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांत आगामी काळात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.