जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोल्हे गटाचे आंदोलन म्हणजे,चोरांच्या उलट्या बोंबा-शहराध्यक्ष यांचा आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या लोकसंख्येनुसार कोपरगाव शहराला पाणी आरक्षित आहे मात्र साठवण क्षमता नसल्यामुळे आरक्षित असलेले सर्व पाणी कोपरगाव नगरपरिषदेकडून उचलले जात नाही. पर्यायाने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याची खरी कबुली कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी देऊन कोल्हे गटाचे आंदोलन म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

“कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात चार नंबर साठवण तलावाचे खोलीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता.त्या निधीतून प्रत्यक्षात खोलीकरणाचे काम देखील सुरु करण्यात आले होते त्यावेळी विरोधकांनी हे काम होवू दिले नाही.खोलीकरणाच्या कामासाठी आलेला जेसिबी यंत्राची मोडतोड करण्याचे पाप केले आहे. त्यावेळी जर चार नंबर साठवण तलावाचे काम झाले असते तर आज परिस्थिती ओढवली नसती”सुनील गंगूले-शहराध्यक्ष कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस.

कोपरगाव नगर परिषदेने नुकतेच दोन पाण्यातील अंतर आठ दिवसांहून अधिक काळासाठी वाढवले असल्याने कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नगरपरिषदेसमोर जाऊन प्रशासनास निवेदन देऊन आकांडतांडव केले आहे.या पार्श्वभूमीवर एक प्रसिद्धी अपत्रक प्रसिद्धीस देऊन त्यावर कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी उत्तर दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”शहराला दररोज पाणी मिळण्यासाठी साठवण तलावांची क्षमता वाढविणे गरजेचे असल्यामुळे आ.आशुतोष काळे मागील पाच वर्षापासून पाच नंबर साठवण तलावासाठी आग्रही होते.मात्र मागील पाच वर्षात माजी आ.कोल्हे यांनी सातत्याने पाच नंबर साठवण तलावाला विरोध केल्यामुळे आज कोपरगाव शहरातील नागरिकांवर भर पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सांगून कोल्हे गटाचे दात त्यांच्याच घशात घातले आहे.त्यामुळे कोपरगाव शहराला भेडसावत असणाऱ्या कुत्रिम पाणी टंचाईला कोल्हेच जबाबदार असल्याचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात चार नंबर साठवण तलावाचे खोलीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता.त्या निधीतून प्रत्यक्षात खोलीकरणाचे काम देखील सुरु करण्यात आले होते त्यावेळी विरोधकांनी हे काम होवू दिले नाही.खोलीकरणाच्या कामासाठी आलेला जेसिबी यंत्राची मोडतोड करण्याचे पाप केले आहे. त्यावेळी जर चार नंबर साठवण तलावाचे काम झाले असते तर आज परिस्थिती ओढवली नसती मात्र कोल्हे गटाने झोपेचे सोंग घेतल्याने नगरातील नागरिकांनी नगारे वाजवूनही उपयोग नाही असे सांगून भविष्यात कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे याची कल्पना असल्यानेच आ.काळे यांनी सत्ता नसतांना देखील पाच नंबर साठवण तलावाच्या कामासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी देखील कोल्हेंनी पाच नंबर साठवण तलावाला पडद्यामागून विरोध करण्यात धन्यता मानली.आ.काळे यांनी निवडून येताच पाच नंबर साठवण तलावाचे काम मार्गी लावले. हेच काम माजी आ.कोल्हे यांनी निवडून आल्यावर केले असते तर आज हि परिस्थिती शहरातील नागरिकांवर आली नसती. मात्र फक्त आमिष दाखवायचे आणि नागरिकांना झुलवत ठेवायचे त्यामुळे आज शहरातील नागरिकांना भर पावसाळ्यात पाणी साठा मंजूर असतांना फक्त आणि फक्त साठवण क्षमता नसल्यामुळेच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे याला सर्वस्वी कोल्हेच जबाबदार असून त्यांचे सत्ताधारी नगरसेवकांनी केलेले आंदोलन हे केवळ शुद्ध नाटक असल्याचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी शेवटी नौटंकी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close