जाहिरात-9423439946
दळणवळण

रस्त्यांची कामे दर्जाहीन होत असल्याच्या जनतेच्या तक्रारी-आरोप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यात वर्तमानात काही ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा सुमार आणि दर्जाहीन असल्याच्या तक्रारी जनतेमधून होत असून या कामांची राज्य शासनाने तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

“कित्येक वर्षापासून कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयणीय झालेली आहे.अजुनही कित्येक रस्ते दुरुस्तीविना प्रलंबित पडलेले आहेत.काही रस्त्यांच्या कामांना शासनाची मंजुरी मिळून कामे सुरु केलेली असली तरी सदर कामेही गुणवत्ताहीन होत असल्याने ग्रामीण परिसरातील जनतेमधून नाराजी व्यक्त केली जात आहे”-राजेश परजणे,अध्यक्ष गोदावरी-परजणे दूध संघ.

कोपरगांव तालुक्यात आमदार,खासदार,मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,पंतप्रधान ग्राम सडक योजना,जिल्हा परिषदेमधील निधीमधून रस्त्यांची कामे सुरु आहेत.परंतु कामाचा वेग लक्षात घेता कामे फक्त आवरण्याचा सपाटा ठेकेदारांकडून सुरु आहे.घाई-घाईत कामे करुन घेण्याच्या प्रकारामुळे कामांची गुणवत्ता दिसून येत नाही.कामे कशा प्रकारे सुरु आहेत हे पाहण्यासाठी संबंधित खात्याचे अधिकारी कामाकडे फिरकताना दिसत नाहीत.पुढे काम चालू तर,मागे लगेच रस्ता उखडल्याचे प्रकार काही ठिकाणी दिसून येत आहे.खडीकरण व डांबरीकरणाची कामे मजबूत स्थितीत होत नसल्याने फार दिवस रस्ते टिकतील अशी परिस्थिती आज तरी दिसत नाही. वर्षभरात रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे होणार आहे. त्यातच सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यावर टाकलेले डांबर व खडी लगेच उघडी पडताना दिसून येत आहे.अशा कामांमुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी अक्षरशः वाया जाणार आहे.

एकतर गेल्या कित्येक वर्षापासून कोपरगांव तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयणीय झालेली आहे.अजुनही कित्येक रस्ते दुरुस्तीविना प्रलंबित पडलेले आहेत.काही रस्त्यांच्या कामांना शासनाची मंजुरी मिळून कामे सुरु केलेली असली तरी सदर कामेही गुणवत्ताहीन होत असल्याने ग्रामीण परिसरातील जनतेमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.हे रस्ते वर्षभरही टिकतील की नाही अशा तक्रारीही मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री महोदयांनी कोपरगांव तालुक्यात व शहरात सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी संबंधित विभागास निर्देशीत करुन कामामध्ये दोष आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व रस्त्यांची कामे दर्जेदार होणेसाठी आदेश करावेत अशीही मागणी श्री परजणे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close