जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या पाणीचोरांचे पडद्याआड राहून हास्यास्पद आरोप-नगराध्यक्ष यांचा हल्लाबोल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

स्वतःमध्ये धमक नसल्याने नगरसेवकांच्या नांवाने हास्यास्पद आरोप करू नका.कोपरगावसाठी आवर्तन मिळावे यासाठी एक महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत.मागील महिन्यात जलसंपदा विभागाला लेखी पत्र पाठविण्यात आले,त्यानंतरही दोन वेळा स्मरण पत्र पाठविले.पण धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी आहे असे लेखी उत्तर कोपरगाव नगरपरिषदेला आले.तरीही लवकरात लवकर आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच केले आहे.

“नगरपरिषद पाणी पुरवठा समिती कोल्हे गटाच्या ताब्यात आहे.सभापती म्हणून सुवर्णा सोनवणे या तुमच्या गटाच्याच आहे,तुमचेच बहुमत.आरोप मात्र माझ्या माथी.तुमच्या प्रथेनुसार तुम्ही हक्काच्या सोनवणे यांच्या नांवाने आपल्या विरुद्ध बातमी दिली हे जनतेला माहित आहे.४२ कोटींच्या पाणी योजनेतून कुणी किती ओरबाडले ? हेही बाहेर काढणार आहे.तुम्ही निळवंडेच्या पाण्याची पुंगी वाजविली तरी मतदारांना गुंगी न आल्याने तुम्हाला घरी बसावे लागले,यामुळे कुणाची चिडचिड सुरू आहे”विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगर परिषदेने नुकतेच दोन पाण्यातील अंतर आठ दिवसांहून अधिक काळासाठी वाढवले असल्याने कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी नगरपरिषदेसमोर जाऊन प्रशासनास निवेदन देऊन आकांडतांडव केले आहे.या पार्श्वभूमीवर एक प्रसिद्धी अपत्रक प्रसिद्धीस देऊन त्यात हा प्रतिहल्ला चढवला आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी चोरणाऱ्यांना आपल्यावर आरोप करायची संधीच मिळालेली आहे.राज्यात व केंद्रातही भाजपाची असूनही व स्वतः आमदार असतांना त्यांनी काय दिवे लावले ? असा सवाल माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता आरोप करून आपण नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्लीत जाऊन नितीन गडकरी यांचे माध्यमातून समृद्धी महा मार्गाचे काम करणाऱ्या “गायत्री कंपनीला ०५ नं.साठवण तलावासाठी खोदकाम सुरू करायला लावले.पण पदाचा गैरवापर करून तुम्ही तेही बंद पाडले.पण जनतेच्या सुदैवाने विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला व आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्याने ते खोदकाम पुन्हा सुरू झाले.सध्या काँक्रीटचा ०५ नं. साठवण तलावाच्या तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे.कोल्हे घराण्यात चाळीस वर्षे आमदारकी असतांना हे तुम्हाला का जमले नाही? पूर्वी २३ दिवसाआड पाणी देणारे तुम्हीच ना ? गेल्या साडेचार वर्षात जनतेला हंडे-मडके घेऊन पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आपण येऊ दिलेली नाही.मुख्य जलवाहिणीवर नळ जोडण्या देणारे तुमचेच अनुयायी.त्यापैकी काहींचे पाणी कमी केलंय,बाकीच्यांचेही पाणी कमी करण्याचे काम सुरू आहे.कोल्हे गटाचे काही नगरसेवक तर व्हॉल्व्हमनला दमबाजी करून जास्तवेळ पाणी द्यायला सांगतात व त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो,मात्र नोकरी सांभाळण्यासाठी व्हॉल्वमन त्यांना नकार देऊ शकत नाहीत.येथील कार्यकर्ते श्री.मंटाला यांनी सांगीतल्याप्रमाणे वितरण व्यवस्थेत दोष आहेतच.कारण पुर्वीच्या काही नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या सोयीनुसार व्हॉल्व्ह बसवून घेतल्याने पाण्याचा अपव्यय होतो.त्यात बदल करणे सुरू आहे.पाच वर्षे पाणी पुरवठा समिती ताब्यात असूनही निष्क्रिय राहाणारा कोल्हे गट आज निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बरळत असल्याचा हल्ला चढवला आहे.

स्वतःच्या प्रभागातील कामे करण्यासाठी ठराव मंजूर केले म्हणजे जनतेवर उपकार नव्हेत.पण शहरातील मोक्याचे रस्ते होऊ नयेत यासाठी उच्च न्यायालयातून स्थगिती आणणारे काय लायकीचे आहेत हे जनतेला कळते.आपण कुणाचे बाहुले होऊ शकतो का हे माजी मंत्री कोल्हे यांना विचारून घेतले तर बरे होईल असा सबुरीचा सल्ला हि द्यायला ते विसरले नाही. महत्वाचे सण असतांनाही नागरिकांना पाणी टंचाईमुळे होत असणाऱ्या त्रासाबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो.पाण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहेत,सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी नगराध्यक्ष वहाडणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close