कोपरगाव शहर वृत्त
हलगर्जीपणामुळे विकास कामे थांबायला नको-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावच्या नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोपरगाव शहराच्या विकासाला भरघोस निधी दिला आहे.परंतु कित्येक कामांचे भूमिपूजन होवून अद्यापपर्यंत कामे सुरु झालेली नाहीत.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून अशा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे थांबायला नको असा इशारा आ.आशुतोष काळे यांनी नुकताच दिला आहे.

कोपरगाव बस स्थानक ते अमरधाम या रस्त्याची पुरती वाट लागली होती.यामुळे आ.काळे यांनी स्वत: या रस्त्याची पाहणी करून सबंधित ठेकेदारास रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.
कोपरगाव नगर परिषद हद्दीत रस्त्यांची मोठी वाट लागली आहे.त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे.कोपरगाव बस स्थानक ते अमरधाम रस्त्याचे काम रखडले होते.त्याबाबत कोपरगाव नगरपरिषद ठोस भूमिका घेत नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत आंदोलन करून करून लवकरात लवकर काम सुरु करावे असा घरचा आहेर दिला होता.त्याबाबत भाजपवाल्यांनी जोरदार टीका केली होती.या पार्श्वभूमीवर शहरातील ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषद अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आ.आशुतोष काळे यांनी आज आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव बस स्थानक ते अमरधाम या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे आ.काळे यांनी सदर रस्त्याच्या नुतनीकरणाच्या कामाच्या सूचना कोपरगाव नगरपरिषदेला दिल्या होत्या.त्या रस्त्याचे काम नुकतेच सुरु झाले असून त्यांनी सदर रस्त्याची पाहणी केली.यावेळी त्यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याचे चर्चिले जात आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव बस स्थानक ते अमरधाम या रस्त्याच्या कामाला सबंधित ठेकेदाराने सुरुवात केलेली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.त्यामुळे आ.काळे यांनी स्वत: या रस्त्याची पाहणी करून सबंधित ठेकेदारास रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून चांगल्या दर्जाचे काम करावे अशा सूचना केल्या आहेत.