जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

समाजकार्यासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची-पवार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

“जोपर्यंत माणसावर आध्यात्मिक संस्कार होत नाहीत तो पर्यंत त्याला समाजाची ओढ लागत नाही आणि समाजाची ओढ लागली की त्याच्या हातून विधायक काम घडून जाते.समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते परंतु तरीही मागे न राहता पुढे चालत राहिले, तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या हातून समाजकार्य आपोआप घडते.”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी अंजनापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“अंजनापूर हे गाव पर्यावरण रक्षणासाठी पुढे आले ही अभिमानाची गोष्ट आहे.त्यामुळेच हे गाव आमच्या महाविद्यालयाने दत्तक घेतले आणि आमच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक या गावात सातत्याने वृक्षारोपण व वृक्ष-संवर्धनाचे काम करीत आहेत”-अशोक रोहमारे,अध्यक्ष कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.

कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वृक्षवेध फाऊंडेशन यांच्यावतीने दत्तक गाव अंजनापूर येथे आयोजित वृक्षारोपण व कृतज्ञता कोनशिलेचे अनावरण आयोजित केले होते त्या वेळी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे होते.

सदर प्रसंगी शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधीकारी संजय सातव,स्नेहालय परिवार अहमदनगरचे संस्थापक गिरीश कुलकर्णी,संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, प्रा.एन.जी.बारे वृक्षवेध फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे,आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी राष्ट्रिय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.शैलेंद्र बनसोडे,कार्यक्रम अधिकारी डॉ.बी.एस.गायकवाड,डॉ.एस.एम.देवरे, प्रा नागरे,डॉ.सुरेखा भिंगारदिवे आदी आयोजक म्हणून उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना मा.अशोकराव रोहमारे म्हणाले की,”अंजनापूर हे गाव पर्यावरण रक्षणासाठी पुढे आले ही अभिमानाची गोष्ट आहे.त्यामुळेच हे गाव आमच्या महाविद्यालयाने दत्तक घेतले आणि आमच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक या गावात सातत्याने वृक्षारोपण व वृक्ष-संवर्धनाचे काम करीत आहेत. महाविद्यालय राष्ट्रिय सेवा योजनेच्या माध्यमातून वृक्षवेध फाऊंडेशनला सहकार्य करण्यास सदैव तयार आहे.”

यावेळी संजय सातव आपल्या मनोगतात म्हणाले की,”अंजनापूर गावात कुठल्याही प्रकारचा एफ.आय.आर.दाखल झालेला नाही.आज एका विधायक कार्यक्रमासाठी मला यायला मिळाले ही अभिमानाची बाब आहे.दोन वर्षांनी माझी सेवा पूर्ण होईल.त्यानंतर मला ही माझ्या गावासाठी या पद्धतीचे काम करण्याची इच्छा आहे.या गावाकडून हीच प्रेरणा घेऊन आपण जात आहे.

स्नेहालय परिवार अहमदनगरचे संस्थापक गिरीश कुलकर्णी म्हणाले की “के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अंजनापूर गावात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून जे काम होते आहे ते नक्कीच कौतुकास्पद आहे.हे कार्य यापुढेही असेच चालू रहावे यासाठी त्यांनी रा.से.यो.व अंजनापूरच्या वृक्षप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत.सदर प्रसंगी रुबी कन्स्ट्रकशनचे संचालक संदीप गाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close