जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जेष्ठ नागरिकांनी दुसऱ्याच्या आनंदात समाधान मानले तर सुख-देशमुख

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

ज्येष्ठ नागरिकांनी ही आपल्या कुटुंबासोबत आयुष्य आनंदाने,सुखाने जगता यावे यासाठी बोलणे,चालणे,हसणे,दानधर्म करणे,दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणे,माफ करणे,योगसाधना करणे,कोणताही विचार न करता पूर्ण झोप घेणे आदी सात सवयी अंगिकारल्या तर जीवन सुखी संपन्न होईल असा आशावाद पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते अशोक देशमुख यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“ज्येष्ठ अर्थतज्ञ अनिल बोकील व विजय दबडगावकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावरील अर्थक्रांती या संघटनेच्या वतीने भारतातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १० हजार निवृत्ती वेतन मिळावे,शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा तयार करावा आदी मागण्या केल्या आहेत”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष,समता नागरी सहकारी पतसंस्था,कोपरगाव.

समता नागरी सहकारी पतसंस्थेने जेष्ठ नागरिकांसाठी ‘आनंदी जीवन कसे जगावे” या विषयावर पुणे येथील सुप्रसिध्द व्याख्याते अशोक देशमुख,डॉ.अभिजित आचार्य आदींची व्याख्याने कोपरगाव,येवला,श्रीमपूर आदी ठिकाणी आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब,ज्येष्ठ कोपरगाव तालुका पेन्शनरचे ज्येष्ठ सल्लागार मन्साराम पाटील,प्रसिद्ध उद्योजक कैलास ठोळे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,अ.’नगर शहरातील रमेश गवळी भूषणनगर,आदिनाथ जोशी सावेडी,तात्याबा दरेकर सारसनगर,पोपट नगरे भिंगार,के.डी.खान्देशी आगरकर,ए.डी.सी.सी. बँकेचे माजी संचालक आर.डी.मंत्री,निर्मला होनराव,अ.’नगर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब पवार,ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम,श्रीरामपूर तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष के.एल.खाडे,डॉ.गोवर्धन हुसळे,चंपालाल ठोळे,येवला येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजेंद्र आहेर,श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रावसाहेब दाभाडे,श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव कृष्णा शिंदे,राजेंद्र शिंगी,समता पतसंस्थेचे महा व्यवस्थापक सचिन भट्टड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना तें म्हणाले की,”ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे त्या संपत्तीचे जतन करणे ही त्या कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी असून प्रथम कर्तव्य आहे.त्यावेळी त्यांनी समता पतसंस्था ही महाराष्ट्रातील अशी पतसंस्था जेष्ठ नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

डॉ.अभिजीत आचार्य ज्येष्ठ नागरिकांनी आहार कसा घ्यावा या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांनी एका वेळेस चार पोळ्या खाण्याऐवजी चार वेळेस चार पोळ्या खाव्यात ज्येष्ठ नागरिकांनी ३० ते ४० मिनिटे चालावे.किमान २४ तासात ४ लिटर पाणी पिलेच पाहिजे.आपण आयुष्यभर कमावलेली संपत्ती शेवटपर्यंत आपल्याच नावावर ठेवावी आपल्या वारसांना ती देऊ नये असे आवाहन केले आहे.

सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी,”ज्येष्ठ अर्थतज्ञ अनिल बोकील व विजय दबडगावकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावरील अर्थक्रांती या संघटनेच्या वतीने भारतातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १० हजार निवृत्ती वेतन मिळावे,शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ॲट्रॉसिटी सारखा कायदा तयार करावा आदी मागण्या केल्या असल्याची माहिती दिली आहे.या व्याख्यानाबाबतर ज्येष्ठ नागरिकांनी समता नागरी पतसंस्थेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार संस्थेचे ठेवी विभाग प्रमुख संजय पारखे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्य कार्यालयाचे अधिकारी कोपरगाव, श्रीरामपूर,अहमदनगर,येवला शाखेचे शाखाधिकारी,कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close